...नाहीतर आम्हीही येऊरच्या बंगल्यातील गोष्टी बाहेर काढू : देशपांडेंचा आव्हाडांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्योरोपांचे राजकारण रंगले आहे
Jitendra Awhad, Sandeep Deshpande
Jitendra Awhad, Sandeep Deshpandesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) तुम्ही कायम इतरांच्या नाकावर जाता, रंगावरुन त्यांना हिणवता. यावरून तुमच्यात वर्णद्वेष व जातीयवाद किती ठासून भरला आहे, हे दिसते, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. एखाद्याच्या व्यंग किंवा रंगावरून टीका करायची नसते. उद्या आम्ही तुमच्या शारीरिक व्यंगांवर टीका केली तर ही गोष्ट तुम्हाला आवडेल का?, असा सवाल आव्हाड यांनी मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना केला होता. त्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आव्हाड यांना इशारा दिला आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी तोंड बंद ठेवावे. राजकीय टिपण्णी करावी, वैयक्तिक बोलू नये. नाहीतर आम्ही ही येऊरच्या बंगल्यातील गोष्टी बाहेर काढू, असा इशारा दिला. हे राष्ट्रवादीचे पुरवठा मंत्री आहेत, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला. त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रायलायत हजेरी लावत कामाचा आढावा घेतला, त्यावरुन देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात आले. पेढे वाटले पाहिजेत. रोषणाई केली पाहिजे. महाराष्ट्रालाही आश्चर्य वाटेल, असेही देशापांडे म्हणाले.

Jitendra Awhad, Sandeep Deshpande
"भविष्यात शिवसेनेशी युती होवू शकते"; प्रकाश आंबेडकरांची 'शिवशक्ती-भीमशक्ती'साठी साद

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर ठाण्यातील सभेत तलवार दाखवली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर देशपांडे म्हणाले, अनेक लोक तलवारी सभेत दाखवतात. आदित्य ठाकरे यांनी ही शिवाजी पार्कात राजकारणात प्रवेश केला, तेव्हा तलवार दाखवली होती. मग त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करणार का?

आमचा पक्ष संपलेला म्हणता मग शरद पवार यांच्यासह ते बाकीचे सर्व का बोलतात. शरद पवार हे भाषणाच्या आधी नाव घेत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेने हे राज ठाकरे यांच्या सभेची मागणी करत होते, असेही देशपांडे यांनी सांगितले. यावेळी देशपांडे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, सुप्रिया सुळे लोकसभेत फक्त ईडीच्या प्रश्नावर बोलतात.

Jitendra Awhad, Sandeep Deshpande
काल छगन भुजबळांवर टीका; आज मुलगा पंकज राज ठाकरेंच्या भेटीला 'शिवतीर्थ'वर!

दरम्यान, आव्हाड म्हणाले होते, राजकारणात वैयक्तिक टीका करायची नसते. हे पाप आहे. राजकारणात मतभेद होऊ शकतात, मनभेद होऊ शकत नाहीत, असेही आव्हाड यांनी सांगितले होते. तसेच राज ठाकरे यांनी विचार करून बोलावे. देशातील मुस्लिमांना ते देशद्रोही आहेत की देशप्रेमी, हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राज ठाकरे यांना कोणी दिला, असा सवालही आव्हाड यांनी केला होता. राज ठाकरे हे त्यांच्या भाषणात हिडीसफिडीस बोलतात, इतरांची टिंगलटवाळी करत असतात. मात्र, मग त्यांना पेट्रोल-डिझेल, गॅसचे वाढलेले भाव दिसत नाहीत का? त्यावर राज ठाकरे काहीच बोलत नाहीत, असेही आव्हाड म्हणाले होते. राजसाहेब तुम्ही शिव्या घालू शकता, आम्ही सुद्धा घालू शकतो. मात्र, माझ्या आई-वडिलांनी आणि पवारसाहेबांनी शिकवलेल्या संस्कारात हे बसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com