Shahaji Bapu Patil : शिंदे - फडणवीस असेपर्यंत मला करूनच दाखवायचं ! ; शहाजीबापू पाटलांचा निर्धार
दत्तात्रय खंडागळे
Shahaji Bapu Patil : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे ४० हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत सांगोल्याचे ठाकरे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील आहेत. त्यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात वेगानं व्हायरल झाली होती. याच शहाजीबापू पाटील यांनी गुरुवारी एक निर्धार केला.
सांगोला तालुक्यातील महावितरण विभागाकडून हातीद येथे नवीन उपविभागास राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांच्याशी 'सरकानामा'ने संवाद साधला. तेव्हा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मला "बोलण्यापेक्षा आता मला करूनच दाखवायचं आहे," असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शहाजीबापू पाटील म्हणाले, "महावितरण विभागातील तालुक्यात नवीन उपविभाग मंजुरीसाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न सुरू होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु त्यास यश मिळाले नाही. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळातच हातीद येथे नवीन उपविभागास महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. याचा फायदा तालुक्यातील विशेषत: शेतकरी बांधवांना होणार आहे,"
'आता मी हे करतो' तो निधी आणतो, पाठपुरावा करतो, असं बोलत बसायचं नाय, कोणाला काय बालायंचाय ते बोलू द्या, कोणाला राजकारण करायचं ते करू द्या. मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीससाहेब असेपर्यंत बोलण्यापेक्षा आता मला करूनच दाखवायचं आहे," असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
"खडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे काम मी या सरकारच्या कार्यकाळात करणार आहे. ते तुम्हाला दिसतीलच. मी याविषयी जास्त बोलणार नाही. आता निधी विषयी, विविध कामांच्या पाठपुराव्या विषयी मी काहीच बोलणार नाही. आता जे काय करायचं आहे ते मी करूनच दाखवणारच. मुख्यमंत्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असेपर्यंत या तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही," असे ते म्हणाले.
"आता तुम्हाला काहीच बोलणार नाही. कोण काय बोलतयं, काय राजकारण करतयं ते बघत बसायच नाही. कोणाला राजकारायचंय ते करू द्या मी फक्त करूनच दाखवणारचं," असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.