Shinde Govt : थोपटेंना अजितदादा अन् विवेक कोल्हेंना विखे-पाटलांशी पंगा घेणं पडलं महागात? शिंदे सरकारनं दिला धक्का

Sugar Factory : शिंदे सरकारनं भाजप संबंधित 6 आणि अजितदादांच्या संबंधित 5 कारखान्यांना मदत केली आहे. पण...
ajit pawar sangam thopate vivek kolhe radhakrishna vikhe patil
ajit pawar sangam thopate vivek kolhe radhakrishna vikhe patil sarkarnama
Published on
Updated on

राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेत्यांना 11 साखर कारखान्यांना 1 हजार 590 कोटी 16 लाख रूपयांची थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांच्या साखर कारखान्यांना राज्य सरकारनं थकहमी नाकारली आहे.

या 11 कारखान्यांपैकी 6 कारखाने भाजप नेत्यांशी, तर 5 कारखाने अजितदादा पवार गटाच्या नेत्यांशी संबंधित आहेत. पण, पुण्याच्या राजकारणावरून अजितदादा ( Ajit Pawar ) पवार यांनी थोपटे कारखान्याला तर अहमदनगरच्या राजकारणावरून कोल्हेंच्या कारखान्याला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोध केल्याचं समजते.

यापूर्वीच्या आदेशात संग्राम थोपटे ( Sangram Thopate ) आणि विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांना थकहमी जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात होते. लोकसभा निवडणुकीत बारामती आणि अहमदनगर मतदारसंघात मदत होईल, या आशेवर दोन कारखान्यांना मदत करण्यात आली होती. सरकारच्या या प्रस्तावास राष्ट्रीय सहकार निगमने मान्यता दिली. पण, या दोन्ही मतदारसंघातून भाजप आणि अजित पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे नवीन आदेशात या दोघांच्या कारखान्यांना थकहमीच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनंच आपल्या यासंदर्भातील पूर्वीच्या आदेशात ही दुरूस्ती केली आहे. पहिल्या यादीत 13 कारखान्यांना 1 हजार 8 हजार 98 कोटी रूपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नव्यानं आदेश काढत 11 कारखान्यांना 1 हजार 590 कोटी 16 लाख रूपयांची थकहमी देण्याचा शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

थकहमी काय आहे?

आर्थिक अडचणीत आलेल्या कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगमकडून कर्ज देण्यात येते. मात्र, या कर्जासाठी राज्य सरकारची थकहमी आवश्यक असते.

थकहमी दिलेले कारखाने आणि कर्जाची रक्कम

  • साखर कारखाना (धारूर, बीड) - 97 कोटी 76 (अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके)

  • श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा- 94 कोटी (भाजप नेते प्रशांत परिचारक)

  • वृधेश्वर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी 93 कोटी (भाजप आमदार मोनिका राजळे)

  • लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना, नेवासा - 140 कोटी (अजित पवार गटाचे नेते नरेंद्र घुले-पाटील)

  • किसनवीर सह. साखर कारखाना, वाई, सातारा, 327 कोटी (अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील)

  • किसनवीर सह. साखर कारखाना, खंडाळा, सातारा १४० कोटी (अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील)

  • अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले - 94 कोटी (भाजपचे नेते मधुकरराव पिचड)

  • श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर - 327 कोटी (भाजपला समर्थन केलेले आमदार विनय कोरे)

  • श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, उमरगा 94 कोटी (भाजप नेते बसवराज पाटील)

  • अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई - 80 कोटी (भाजप नेते रमेश आडसकर)

  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा 103.40 कोटी (अजित पवार गटाचे राजेंद्र नागवडे)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com