Sanjay Pande News : माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचं ठरलं; विधानसभेच्या मैदानात उतरणार, नव्या पक्षाची करणार घोषणा

Politcal News : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे इच्छुक आहेत. लवकरच राजकीय पक्ष संघटना काढण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे समजते. त्या माध्यमातून पांडे हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत.
Sanjay Pande News
Sanjay Pande NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे इच्छुक आहेत. लवकरच राजकीय पक्ष संघटना काढण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे समजते. त्या माध्यमातून पांडे हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी संजय पांडे (Sanjay Pande) हे उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीकडून त्यांना लोकसभा निवडणूक लढू नये, यासाठी विनंती करण्यात आल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती. मात्र, आता लवकरच राजकीय पक्षाची संघटना काढून ते विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे समजते. (Sanjay Pande News)

लोकसभा निवडणुकीवेळी अनेक नागरिकांनी आपल्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरल्याचे संजय पांडे यांनी आपल्या फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यावेळी सांगितले होते. नागरिकांच्या आग्रहावर मी विचार करत होतो. रिटायरमेंटनंतर आलेल्या अडचणीत विषयी देखील पांडे बोलले होते.

आयपीएस (IPS) म्हणून सेवानिवृत्त झालो आहे. माझ्यावर केस असल्याने दिल्लीमधील केसमध्ये मला जामीन मिळायला अडचण येत होती. त्यामुळे सामान्य माणसांना किती अडचणी येत असतील. त्यामुळे सामान्य माणसांसाठी संघटना स्थापन करून त्यांना मदत करण्याची तयारी संजय पांडे यांनी केली आहे.

Sanjay Pande News
Babajani Durani: अजितदादांना धक्का; नाराज दुर्राणींचे घरवापसीचे संकेत, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढणार

फेब्रुवारी 2022 मध्ये परमबीर सिंह हे मुंबईचे पोलिस आयुक्त असताना मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके सापडल्याचे प्रकरण देशभर गाजत होते. त्यावेळी सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांची जागी संजय पांडे यांच्याकडे मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदाची धुरा देण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त पद संभाळले होते. त्यामुळे त्यांनी कठीण काळात ही कारकीर्द सांभाळली होती.

Sanjay Pande News
Rahul Gandhi : राहुल गांधींचा दिल्लीतील पत्ता बदलला; आता निर्णय त्यांच्या हाती...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com