Sanjay Raut On BJP : संजय राऊतांनी भाजपला डिवचले; म्हणाले, "फोडाफोडी करूनही निवडणुका..."

Maharashtra Government : केंद्र आणि राज्य सरकारची मिलीभगत
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Mumbai News : भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून सरकारमध्ये सहभागी करून घेतले. दुसऱ्या पक्षांची फोडाफोडी केली तरी, त्याचा फायदा होण्याबाबत सरकारला साशंकता आहे. त्यामुळेच विद्यापीठाच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपून दीड वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ लोटला तरी तरी निवडणुका टाळल्या जात आहेत. भाजपकडून महापालिका निवडणूक घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. तुमच्यात निवडणुका घेण्यास दम नाही. त्यामुळे तुम्ही लोकसभा आणि विधानसभेला आमच्याशी कसा सामना करणार? अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. (Latest Political News)

Sanjay Raut
Sharad Pawar On Onion Issue : कांद्याला दिलेला भाव अमान्य; शरद पवारांचा केंद्र अन् राज्य सरकारविरोधात शड्डू

राज्यात शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेसचे राहुल गांधी हे प्रमुख तीन चेहरे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात निवडणुका लढविण्यात येणार आहेत. भाजपने कितीही फोडाफोडी केली तरी, त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही. लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १८ खासदार होते, तो आकडा कायम राहणार असल्याचाही दावा राऊतांनी केला आहे. ते म्हणाले, "शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे १८ खासदार आणि एक दादरा नगर हवेलीचा असे १९ खासदार पुन्हा निवडून येतील."

राज्यापालनियुक्त १२ आमदार नियुक्तीवरुन खासदार राऊतांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकावर निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्रानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेली विधानपरिषदेच्या १२ आमदारांची यादी परत पाठवल्याचे स्पष्ट झाले. यावर राऊतांनी देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि दिल्लीतील सत्ताधारी यांची ही मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut
Satara NCP News : मित्र पक्षांनी शरद पवारांबाबत जपून वक्तव्ये करावीत : शशिकांत शिंदेंचा राऊतांना इशारा

कांदा खरेदी प्रश्नात राज्य सरकार मस्तवालपणा करीत आहे. कांदा हे गरिबांचे खाद्य आहे, ते श्रीमंताचे खाद्य नाही. सरकार म्हणत असेल की, कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, तर हा सरकारचा मस्तवालपणा आहे", असा आरोपही त्यांनी केला. यावेळी नाव न घेता मंत्री दादा भुसे यांच्यावर सडकून टीकाही राऊत यांनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com