Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut On BJP : आणीबाणी अन् मोदी-शाह; बाळासाहेबांचा संदर्भ देत संजय राऊतांनी भाजपला पुन्हा गाठलं

Emergency In India : त्यावेळी देशातील अराजकतेचा गैरफायदा देशाचे परकीय शत्रू घेण्याची भीती होती.
Published on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाची टुम काँग्रेस आणि इतर पक्षांनी लावून धरली आणि खोटा प्रचार केला, असा आरोप भाजप करत आहे. मात्र आणीबाणी लागू करून काँग्रेसनेच संविधानाचा अपमान केला. त्यामुळे काँग्रेसच संविधानाच्या विरोधात असल्याचा पलटवार केला.

मात्र आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत भाजप आणि शिवसेना मते मागत असल्याचा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 'रोखठोक'मधून लगावला आहे.

संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. त्याचे रडगाणे मोदी-शहा आजही गात आहेत. छाती पिटत आहेत, पण उघडपणे आणीबाणी जाहीर करण्याची हिंमत इंदिरा गांधी यांनी तेव्हा दाखवली, पण सध्याचा भाजप पन्नास वर्षांपूर्वीचे रडणे विसरत नाही, असे म्हणत त्यावेळी नेमके काय घडले होते, याचा उहापोह राऊतांनी केला.

भारतात अराजक माजवण्याची सुरुवात झाली होती. पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत, असे विरोधी नेते जाहीरपणे बोलू लागले होते. ही देशाविरुद्ध उघड बंडाची चिथावणी होती. याचा गैरफायदा देशाचे परकीय शत्रू घेण्याची भीती होती. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा करण्याची हिंमत दाखवली, असे स्पष्टीकरण राऊतांनी दिले.

Sanjay Raut
Rohit Patil : रोहित पाटलांना शरद पवारांची 'पॉवर'; विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्याचे संकेत

त्या आणीबाणीस खुला पाठिंबा देण्याची हिंमत तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी दाखवली. मोदी व शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरून आज मते मागतात, पण ज्या आणीबाणीच्या नावाने मोदी-शहा आज छाती पिटत आहेत त्या आणीबाणीचे समर्थक बाळासाहेब ठाकरे होते, याची आठवण करून देत संजय राऊतांनी भाजपला कोंडीत पकडले आहे. याला भाजप काय उत्तर देणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sanjay Raut
Worli Hit And Run Case Update : वरळी हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी पोलिसांना झटका; आरोपीच्या वडिलांची अटक बेकायदेशीर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com