Maharashtra Political News : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. मुंबईत एकाच दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहे. बीकेसी मैदानावरून आघाडीच्या सभेतून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनाच लक्ष्य केले. नरेंद्र मोदी हे आता कार्यवाहक पंतप्रधान आहेत. त्यांना आम्ही रस्त्यावर आणले असून ४ जूननंतर त्यांना झोळी घेऊन जावे लागणार आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला.
संजय राऊत Sanjay Raut म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींचा राज्यातील मुक्काम वाढला आहे. ते राज्यभर फिरत आहेत. त्यांच्यावर गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आली आहे. आम्ही तुम्हाला रस्त्यावर आणले आहे. आता 4 जूननंतर तु्म्हाला तुमची आवडती झोळी घेऊन निघावे लागणार आहे. महाराष्ट्राशी पंगा घेतला, तो तुम्हाला महागात पडणार आहे. आता मी गॅरंटी देतो की मोदीजी आप तो गयो... मोटा भाई, छोटा भाई, हा भाई-तो भाई सगळे 4 जूननंतर जाणार आहेत, असा घणाघातही राऊतांनी केला आहे.
भाजप हा चोर बाजार आहे. तेथे सर्व चोरीचा माल मिळतो. मुंबईतही एक चोर बाजार आहे. अख्ख्या देशातील चोरलेला माल तेथे चकचकीत करून मिळतो. तसेच भाजपमध्ये सर्व नेते होतात. विरोधातील सर्व भ्रष्टाचारी नेते त्यांनी आपल्या गोटात घेतले आहेत. आता त्यांच्या जीवावर ते 400 हून अधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात, असे म्हणत राऊतांनी पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि भाजपवर टीका केली.
नरेंद्र मोदी, अमित शाह या खोटे बोलणाऱ्यांचे सरदारांनी गेल्या दहा वर्षांत विष पेरण्याचे काम केले. त्यांनी देशाला एक मंत्री दिला आहे. तो म्हणजे, काम धंदा मंदम, मंदी प्रचडंम, जिंदगी XX फिर भी घमेंडम. आता 4 जूननंतर तुमची घमेंड उतरवणार आहोत, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.
भाजपने राज्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे पाप झाले आहे. कालपर्यंत अजित पवारांना चक्की पिसींगला पाठवणार होतात, आता त्यांचे किंसिंग करतात आहात. एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकणार होतात, ते त्यांच्यासोबत आहेत. भ्रष्टाचार करा, बलात्कार करा, व्याभिचार करा आणि भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी व्हा, असे त्यांचे सूत्र आहे. त्यांना दुसऱ्याची पोरे घेऊन विकास करायची आहेत, असे म्हणत राऊतांनी भाजपचा समाचार घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.