मुंबई : एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असा नाही, सारा महाराष्ट्र जिंकला असा होत नाही. या राज्याची सुत्रे शिवसेनेकडेच (Shivsena) असतील आणि मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंकडेच असतील, फार घमंड करु नका, अगदी स्पष्टच सांगायचं झाल तर तेरा घमंड चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी है...अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) निशाणा साधला आहे. शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. (Sanjay Raut Criticized on Devendra Fadanvis)
- काय म्हणाले संजय राऊत
केंद्रीय यंत्रणांची भिती आम्हाला दाखवून नका, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स यांना आम्ही भीत नाही. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असे नाही तर तुडवले जाल अशी महाराष्ट्राची माती आहे. कटकारस्थान करुन काहीही होणार नाही. राज्यसभेच्या निवडणूका पार पडल्या, ठीक आहे एखादी जागा इकडे तिकडे होत असतो. आता विधान परिषदेच्या जागांसाठी घालमेल सुरु आहे, पण मी इतकच सांगतो. एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकलं असा नाही, सारा महाराष्ट्र जिंकला असा होत नाही. या राज्याची सुत्रे शिवसेनेकडेच असतील आणि मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंकडेच असतील, फार घमंड करु नका, अगदी स्पष्टच सांगायचं झाल तर, 'तेरा घमंड चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी है,' आणि ती राहणार ती दिसेल, या बादशाहीला नख लावण्याची हिंमत आजपर्यंत कोणी केली नाही. कोणी कितीही हवेत तलवारबाजी करुदे, पण आज संपूर्ण देश पेटला आहे.
अग्नीपथ काय आहे हे, आता सैन्यात कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणार, सैन्य पोटावर चालतं हे माहित होतं पण चार वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर सैन्य भरती करणार असा मुर्ख निर्णय जगाच्या पाठीवर कोणत्याही राज्य कर्त्यांने घेतला नाही. या देशात मोहम्मद तुघलक होता, त्याने सुद्धा असा निर्णय घेतला नसता,पण आज चार वर्षांचं कंत्राटी पद्धतीने सैन्य भरतीचा हा निर्णय घेतला आहे. देशाचं रक्षण कोणी करायचं हे ज्याला कळत नाही त्याच्या हातात आज देशाची सुत्रे आहेत. ठेकेदारी पद्धतीने आज गुलाम नेमले जातात.देशाचं सैन्य नाही. म्हणून संपूर्ण देश पेटला आहे. पण महाराष्ट्र शांत आहे. पण महाराष्ट्र आतून खदखदतोय, पण महाष्ट्राची सुत्रे जोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या हातात आहेत. तोपर्यंत राज्य स्थिर आणि शांत राहिल.
महाराष्ट्र अशांत करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत पण तो तुम्हाला जमणार नाही. ज्यावेळी श्रीलंकेतील लोक त्यावेळी मी सुद्धा, आपल्या देशात अशी स्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही, असंं म्हटलं होतं. त्यावर भाजपने जळजळीत टीका केली होती. पण आज पहा एका महिन्यात देशातला संपूर्ण तरुण बेरोजगार आज रस्त्यावर उतरला आहे. त्यांना रोखण्यासाठी आज सैन्याला बोलवावंं लागल. बिहारमध्ये सैन्य आले आहे. याला राज्य करणंम्हणत नाही, राज्य कसं चालवलं जात हे पाहायचं असेल तर महाराष्ट्रात या. मिस्टर फडणवीस नुसतं कटकास्थान करुन राज्य चालत नाही, तर सर्वांना सोबत घेऊन राज्य चालवावं लागतं. ती क्षमता फक्त शिवसेनेच्या नेतृत्त्वाकडे आहे. असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.