Badlapur School Crime Case : बलात्कारी रेवण्णाची शब्बासकी विसरलो नाही; याच मोदींचेच फडणवीस आणि महाजन हस्तक...

Badlapur School Case : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाने तटस्थ भूमिका घ्यावी. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेवरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

"आंदोलकांवर गु्न्हे दाखल करत आहात, त्यांच्या भावनांशी खेळत आहात, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये बलात्काराच्या प्रचाराला जातात, गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत. देवेंद्र फडणवीस देखील त्यांचेच हस्तक आहे. त्यामुळे काय अपेक्षा करणार?", असा सवाल संजय राऊत यांनी म्हटले.

बदलापुरात आंदोलकांची समजून काढण्यासाठी गेलेले भाजप (BJP) नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत चांगलेच भडकले. "गिरीश महाजन यांचे डोके ठिकाणावर नाही. हे पुढे लैगिंग शोषण झालेल्या चिमुरड्या देखील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील, असे म्हणू शकतात. अशा प्रकरणात राजकारण करू नये. विरोधकांचा काय संबंध? मुलींचे वय पाहा. पालकांची तक्रार घ्यायला तयार नाही, पोलिसांवर किती दबाव होता, ते पाहा. त्यावर का बोलत नाही?" त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर आणि मोदींवर आक्षेप आहे. हे मोदी बलात्काराच्या प्रचाराला जातात, गिरीश महाजन आणि फडणवीस त्यांचेच हस्तक आहे. त्यामुळे यांच्याकडून काय आपेक्षा करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Badlapur School Case : बदलापुरातील 300 आंदोलकांवर गुन्हे, शाळांना सुट्टी, इंटरनेट बंद, पोलिस बंदोबस्तात वाढ अन् बरचं काही...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील संजय राऊत यांनी हल्ला चढवला. एकनाथ शिंदे बदलापुरातील घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची भाषा करत आहेत. परंतु या घटनाबाह्य सरकारचा खटला जलदगती न्यायालयात चालला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात. बलात्कार जसा अबलेवर होतो, तसा राज्यघटनेवर सुद्धा होतो. महाराष्ट्रात सरकार राज्यघटनेवर बलात्कार करून निर्माण झाले आहे. हा खटला त्यांना जलदगती न्यायालयात नकोय, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut
Badlapur School Case : बदलापूर अत्याचारप्रकरणी दीपक केसरकर 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई, तर चार शिक्षक निलंबित

पंतप्रधान मोदींच्या मानसिकेतवर प्रहार

संजय राऊत यांनी सरकारची मानसिकता ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सारखी मानसिकता आहे, असे म्हणून जोरदार हल्ला चढवला. "मी हे अत्यंत जाणिवपूर्वक बोलतो. प्रधानमंत्री कर्नाटकमधील बदनाम बलात्कारी प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी गेले होते. त्यांना माहित होते, 200 महिलांनी लैगिंग शोषणाच्या तक्रारी झाल्या आहेत. शेकडो व्हिडिओ त्याचे बाहेर आले आहेत. तरी प्रधानमंत्री त्या प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात, त्याचे कौतुक करतात, त्याला चरित्र्याचे प्रमाणपत्र देतात. अशा व्यक्तीचे नेतृत्व महाराष्ट्र मान्य करते, बलात्काऱ्याला प्रतिष्ठा देण्याचं, त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार आणि बदलापुरामधील जनतेचा आक्रोश सरकारविरोधात होता, प्रधानमंत्र्याविरोधात, मोदींच्या वृत्तीविरोधात होता", असा जोरदार हल्ले संजय राऊत यांनी चढवला.

शिवसैनिक बदलापुरात जाणार

संजय राऊत म्हणाले, "हे सरकार लैगिंग शोषण करणाऱ्याला काहीच करणार नाही, शेवटी गुन्हेगाराला वाचवले जाईल. या उद्रेकातून लोकं रस्त्यावर उतरले असतील, तर तुम्ही त्यांना गुन्हेगार ठरवता. लोकांवर खटले दाखल करतात. काय करता तुम्ही, महाराष्ट्राची अब्रू काढता". शिवसेना ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बदलापुरात जाणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच महाविकास आघाडीत या घटनेवर काय आंदोलन करायचे यावर चर्चा करून निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रात याप्रकरणात महिलांच्या सुरक्षितेसाठी काय करता येईल, आवाज कसा बुलंद करता येईल, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीत विचारविनिमय सुरू असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाष्य

संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने तटस्थपणे काम करायला हवं. पश्चिम बंगालमधील दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातील दखल घ्यायची नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचे पालन करायला शिकलं पाहिजे. बांगलादेशात उद्रेक झाला, सर्वोच्च न्यायालयात घुसले आणि तिथे तोडफोड झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना राजीनामा द्यावा. जनक्षोभातून आपल्या सर्वोच्च न्यायालयाने शिकलं पाहिजे, न्यायव्यवस्था, जनता आणि प्रशासनाने शिकलं पाहिजे", असे संजय राऊत यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com