आमच्यावर आरोप करताहेत..तुमच्याकडेही चार बोट आहेत ; गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

Satesh Patil|वेगवेगळ्या नेत्यांची नावे टाकून आरोप यापूर्वीही आरोप झालेले आहे.
Devendra Fadnavis, Satej Patil
Devendra Fadnavis, Satej Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना मोक्‍काच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी षडयंत्र रचले. खोटे पुरावे तयार केले. इतकेच नाही तर त्‍यांच्या टार्गेटवर मी स्‍वतः सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपतील इतर प्रमुख नेते होते,'' असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत केला. फडणवीसांनी याबाबतचे पुरावे सादर केले आहेत.

फडणवीसांच्या आरोपावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, ''तुम्ही जर एक बोट समोरच्यावर दाखवत असाल तर तुमच्याकडेही चार बोट आहेत हे विसरून चालणार नाही, कुणावरही असे आरोप करता येत नाहीत, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे आरोप केले आहेत. त्याची सत्यता पडताळली जाईल,'' ते साम टिव्हीशी बोलत होते.

''आम्हीही विरोधात होतो त्यावेळी ही आम्ही लेखी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे सादर केले आहेत. या गोष्टीची सत्यता पडताळली जाईल. मग गृहमंत्री उत्तर देतील. एक मंत्री म्हणून मी व्यवस्थित माहिती घेऊन विधानभवनात उत्तर देईन,'' असे सतेज पाटील म्हणाले.

सतेज पाटील म्हणाले, ''वेगवेगळ्या नेत्यांची नावे टाकून आरोप यापूर्वीही आरोप झालेले आहे. बोट दाखवताना हाताची चार बोटं आपल्याकडे आहेत हे विसरू नये, विरोधापक्ष नेते म्हणून त्यांनी सांगितलेल्या माहितीची दखल घेतली जाईल,''

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी (८ मार्च) थेट विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin Chavan)यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे.

Devendra Fadnavis, Satej Patil
मनसेचे पुण्यात आज शक्तीप्रदर्शन ; ठाकरी तोफ धडाडणार

राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या गंभीर आरोपांबाबत प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''व्हिडीओमधील फेरफार आज ना उद्या बाहेर येईल,'' असं सांगत चव्हाण यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com