Sanjay Raut on Hindu March : ... म्हणूनच शिवसेनाभवनपुढं आक्रोश; संजय राऊत यांनी सांगितलं कारण

Shinde-Fadanvis Goverment : मोदी-शहांवर निशाना साधत राज्य सरकारवर सडकून टीका
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Hindu March and Shivsena : आज मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा (Hindu Jan Akrosh March) काढण्यात आला आहे. यात भाजप (BJP) आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आदी नेत्यांनी सहभाग घेतला होता. हा मोर्चा शिवसेना भवनसमोरून मार्गस्थ झाला. त्यावेळी भाजप नेत्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर तीव्र शब्दात टीका केली. या मोर्चाबाबत मात्र ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दोष देत राज्य सरकारला टोले हाणले आहेत.

यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, देशावर आठ वर्षांपासून हिंदू असलेल्या शक्तिमान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांचं राज्य आहे. महाराष्ट्रातही हिंदू म्हणवणाऱ्यांचं सरकार आहे. असं असतानाही मुंबईत हिंदुंचा आक्रोश मोर्चा निघतो? हे दुर्दैवी आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर पटलवार केला आहे.

Sanjay Raut
Mumbai News : 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' कडे ठाकरे गट, मनसेनं फिरवली पाठ...

कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यांचा मरणोत्तर सन्मान केला जातो, मात्र हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. याकडेच लक्ष वेधण्यासाठी हिंदुचा हा 'आक्रोश' आहे, अशा तीव्र शब्दात राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाना साधत राज्य भाजपवर सडकून टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, "देशात हिंदू असलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या शक्तीमान नेत्यांचे राज्य आहे. महाराष्ट्रातही हिंदूंचं राज्य आलंय, असं सांगत आहेत. तरीही हा आक्रोश मोर्चा निघत आहे.काश्मीरमध्ये कश्मीरी पंडीत (Kasmiri Pandit) आक्रोश करत न्याय मागतात. त्यामुळं हा मोर्चा योग्यच आहे. कारण या स्वतःला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. या मोर्चाचे स्वागत केलं पाहिजं."

Sanjay Raut
Hindu Jan Aakrosh Morcha : मुंबईच्या संरक्षणासाठी 'त्यांना' बाहेर काढू... नितेश राणे यांचा इशारा

त्यामुळंच शिवसेनाभवनसमोर आक्रोश

राऊत म्हणाले की, हिंदुचं राज्य असतानाही काश्मीरमध्ये पंडितांवर अन्याय होत आहे. त्यांच्यावर न्याय मागण्यासाची वेळ आली आहे. राज्यासह देशातील हिंदुंचा आवाज दाबला जातोय. त्यामुळंच हिंदू नागरिकांवर आक्रोश करण्याची वेळ आलीय. त्यांना माहित आहे की शिवसेना (Shivsena) पक्ष हा हिंदुसाठी शेवटची आशा आहे. तर हिंदुंच्या भावना समजून घेण्यासाठी शिवसेना भवन हे शेवटचं आशास्थान आहे. त्यामुळंच आज हिंदुनी शिवसेना भवन (Shivsena Bhavan) पुढे येत आक्रोश केला."

Sanjay Raut
Nagpur News : गाणारांचा जिवात जीव : 'नॉट रिचेबल' भाजप आमदार अखेर 'रिचेबल'; म्हणाले...

हिंदुचा आवाज दाबला जातोय

यावेळी राऊत यांनी प्रजासत्ताक दिनी केलेल्या सन्मानाबाबतही केंद्र सरकारला लक्ष्य केलं. राऊत म्हणाले, "यंदा हिंदुह्रदयसम्राट, वीर सावरकर यांचा सन्मान केला जाईल, याची वाट पाहत होतो. मात्र ज्या मुलायम यादवांनी रामभक्तांवर गोळ्या चालविल्या त्यांचा सन्मान केला. आठ वर्षांपासून सत्ता असूनही या देशात हिंदू समाजाचा आवाज दाबला जातोय. त्यामुळं हिंदू आक्रोश करतात, हे कोणाचं अपयश आहे? त्याचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे."

दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या हिंदू मोर्चाच्या माध्यमातून भाजप राजकीय पोळी भाजून घेत असल्यची टीका केली आहे. भाजपच्या हिंदू जनआक्रोश मोर्चातून जाती-धर्मात लव्ह जिहादच्या नावाखाली विष पेरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलाय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com