Sanjay Raut Video : संजय राऊतांचे टेन्शन दूर, सोमय्या प्रकरणात न्यायालयाने दिला मोठा दिलासा

Sanjay Raut granted bail : संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या संस्थेने 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप 2022 मध्ये केला होता.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाकरेंची धडाडणारी तोफ राऊत तुरुंगात जाण्याची भीती होती. मात्र, संजय राऊत यांनी शिक्षे विरोधात माझगांव कोर्टात अपील केले होते. या अपीलावर आज (शुक्रवार) सुनावणी पार पडली.

कोर्टाने संजय राऊत यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर करत शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या संस्थेने 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप 2022 मध्ये केला होता. या विरोधात मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा शिवडी न्यायालयात केला होता. न्यायालायने संजय राऊत यांना दोषी ठरवत या प्रकरणात 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.

Sanjay Raut
Lok Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्र्यांची खासदार पत्नी काँग्रेसला देणार धक्का; एकमेव जागाही जाणार

शिवडी न्यायालायने दिलेल्या निकालाच्या विरोधात संजय राऊत यांनी माझगांव कोर्टात अपील केले होते. कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे.

नेमके प्रकरण काय?

संजय राऊत यांनी एप्रिल 2022 मध्ये सामना वर्तमानपत्रातून 100 कोटींचा शौचालय घोटाळा केला होता. मीरा-भाईंदर परिसरातील 154 पैकी 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट घेतले. या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी 3 कोटी 90 लाखांचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात मानहानीचा अर्ज दाखल केला होता.

Sanjay Raut
Chhagan Bhujbal : पुतण्याने साथ सोडताच भुजबळांना झाली ठाकरे,पवार अन् मुंडेंची आठवण; म्हणाले, पुतण्यांचा डीएनएच...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com