Sanjay Raut News : संजय राऊतांना न्यायालयाचा दिलासा; अटकपुर्व जामीन मंजूर

आचारसहिंतेचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आचारसहिंतेचा भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी त्यांचा जामीन मंजूर केला आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

बेळगावात 30 मार्च 2018 रोजी झालेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाषण केले होते. या भाषणावेळी राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर आचारसहिंतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकऱणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. राऊतांनी भाषण करुन दोन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून टिळक वाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जे.एम.एफ.सी चौथ्या न्यायालयात पोलिसांनी त्यांच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.

Sanjay Raut Latest News
Aditya Thackeray News : पोलिस म्हणतात, दगडफेक झालीच नाही; सभा सुरळीत पार पडली, ठाकरेही सुखरूप परतले..

या प्रकरणी ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार, मारुती कामाणाचे, शंकर बाळ नाईक आणि हेमराज बेंचण्णवर यांनी संजय राऊत यांच्या बाजून युक्तीवाद केला. दरम्यान, कोर्टाच्या तारखांना संजय राऊत न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. पण तरीही राऊत सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर राऊतांवर अटकेची कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिले. त्यावर अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी राऊतांनी अर्ज केला. या अर्जावर आज (८ फेब्रुवारी) बेळगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन मंजूर केला.

नोव्हेंबर 2022 मध्ये बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावलं होतं. याबाबत मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, "शिवसेना सीमाबांधवांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. सीमा भागातील मराठी बांधवांवर अनेकदा हल्ले झाले किंवा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. याचे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत,'' असं मी म्हटलं होतं. यात प्रक्षोभक असं काय म्हटलं होतं, हे आम्हाला कळलं नाही, असं राऊतांनी सांगितलं.

बेळगाव न्यायालयाने मला 1 डिसेंबरला हजर राहायला सांगितलं आहे. पण मी त्याठिकाणी गेलो तर न्यायालयात माझ्यावर तिथल्या संघटनांकडून हल्ला होऊ शकतो. मला बेळगावमधील तुरुंगात डांबून ठेवलं जाऊ शकतं, या सर्व कारस्थानाची माहिती माझ्याकडे आहे. पण मला अटकेची भीती नाही. असंही राऊतांनी नमुद केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com