Sanjay Raut यांचा जेलमधील मुक्काम वाढला ; प्रवीण राऊतांनी प्रकल्पामध्ये फायदा मिळवून दिला !

Sanjay Raut : आता पुन्हा एकदा 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राऊतांना पाठवण्यात आले आहे.
sanjay raut
sanjay rautsarkarnama

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. (mp sanjay raut judicial custody extended)

त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. संजय राऊतांचा मुक्काम सध्या ऑर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. राऊतांना आता पुन्हा एकदा 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. गेल्या 22 दिवसांपासून ते तुरुंगात आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. त्यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांना 8 दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा एकदा त्यांना ईडीनं न्यायालयात हजर केले असता, त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

sanjay raut
Monsoon Session :'चला, काही तरी मिळालं' ; सभागृहात शिरसाटांना आमदारांचा टोला

संजय राऊत तुरुंगातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी कारागृह प्रशासनाकडे वही आणि पेनाचीही मागणी केली होती, जी मंजूर झाली असून, आता ते दिवसभरात अनेकदा काहीतरी लिहीत असतात. एवढेच नाही तर त्यांनी अनेक पुस्तकांची मागणी केली होती, ती उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तुरुंगात संजय राऊत काही ना काही वाचत राहतात.

सक्तवसुली संचालनालयाने (ED)आज न्यायालयात सांगितले..

  • गुरू आशिष चे संचालक प्रवीण राऊत यांच्या आडून संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा केला.

  • प्रवीण राऊत यांनी एक पैसाही या प्रकल्पात गुंतवला नाही. मात्र, त्यांच्या खात्यात 112 कोटी रुपये आले. याचा फायदा राऊत यांनाही झाला.

  • राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात 1 कोटी 60 लाख रुपयांचे हस्तांतर झाले. याच पैशांतून राऊत यांनी अलिबागला प्लॉट घेतला. स्वप्ना पाटकर यांच्या नावावर एक प्लॉट घेण्यात आला.

  • प्रवीण राऊत यांच्या आडून संजय राऊत यांनी घोटाळा केल्याचे निदर्शनास येत आहे.

  • प्रवीण राऊत हा संजय राऊत यांचा जवळचा व्यक्ती आहे.

  • प्रवीण राऊत याने म्हाडा आणि इतर योजनांमध्ये राऊत यांना फायदा मिळवून दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com