Sanjay Raut On Ram Mandir : औरंगजेबने जिझिया लावला आता भाजपनेही रामावर टॅक्स...; संजय राऊतांची घनघोर टीका !

Sanjay Raut News : "राम मंदिराच्या निर्मितीत भाजपचं काहीच योगदान नाही..."
Sanjay Raut : Amit Shah
Sanjay Raut : Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut On Ram Mandir : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपवर पुन्हा एकदा तुफान हल्लाबोल केला आहे. राम मंदीर, देशभरातील आमागी विधानसभा निवडणुका इत्यादी मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. भाजपची आस्था असणाऱ्या राम मंदीराच्या मुद्द्यावरूनच राऊतांनी घेरल्याने भाजपमधून याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटण्याच्या शक्यता आहेत. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशच्या प्रचारामध्ये अमित शहा यांनी मतदारांना दिलेल्या एका आश्वासनावरून राऊतांनी हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, "मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आल्यास रामलल्लाच्या मोफत दर्शनाचं अमित शहांनी आश्वासन दिलं आहे. मात्र मध्य प्रदेशच्या जनतेने भाजपचा पराभव घडवल्यास रामलल्लाच्या दर्शनासाठी पैसे घेणार का? मोदी सरकारकडून रामलल्लांवर कर लावल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला."

ठभगवान प्रभूरामचंद्र संपूर्ण विश्वाचंच देव आहे. मात्र भाजपने रामाचा वापर निवडणुका आणि प्रचारासाठी केला आहे. भाजप विजयी झाली तर रामाचं मोफत दर्शन आणि पराभूत झाली तर पैसे मोजावे लागणार आहेत. यांना प्रभू रामावरही टॅक्स लावला. औरंगजेबच्या काळात जिझिया कर लावला जायचा, आता भाजपकडून तसाच कर लावला आहे. भाजपने याची जाहीर माफी मागायला हवी. तुम्ही रामाचे मालिक बनलात का?" असा खडा सवाल राऊतांनी विचारला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com