Sanjay Raut On Diwali : सगळीकडे दिवाळसणाचा उत्सव आहे. आज दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जात आहे. विविध राजकीय नेत्यांनीही दिवाळी साजरी केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खंदे समर्थक आणि खासदार संजय राऊत यांनीही यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली आहे. सोबतच त्यांनी मागच्या वर्षीच्या जेलमध्येच साजरी केलेल्या दिवाळीच्या कटू आठवणीही सांगितल्या. त्यांनी स्वत:ला राजकीय युद्धकैदी असे म्हणतानाच, या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी कितीही वेळा जेलमध्ये जाईन, असे म्हटले आहे. (Latets Marthi News)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय म्हणाले, "तुरूंगात कोणताही सण साजरा होत नाही. तुरूंगात फार तर १५ ऑगस्ट - २६ जानेवारी हे शासकीय सण साजरे होतात. पण ते आमच्या सारख्या कैद्यांना तिथे फिरण्याची मुभा नसते.मी जेलमध्ये होतो, तेव्हा साधरण दिवाळीच्याआधी जामीन होईल, असं अंदाज होता. मात्र जेलमध्येच दिवाळी साजरी करावी लागली."
राऊत पुढे म्हणाले, "जेलमध्ये होतो तेव्हा घरून थोडासा फराळ आला होता, उटण्याचं एक पाकिटही आलं होतं. उटणं आमचं आम्हीच लावून घेतलं. थंड पाण्यात आंघोळ करत आम्ही उटणं लावलं होतं. नंतर जो एक चकली आणि लाडू आला होता तो आम्ही खाल्ला अन् जेलमध्येच दिवाळी साजरी केली. तशा परिस्थितीत लढाई लढली. ही लढाई आहे. युद्धावरच्या सैनिकाला कुठे दिवाळी असते? मी स्वत:ला राजकीय युद्धकैदी समजतो. या देशातली लोकशाही टिकवण्यासाठी, हुकूमशाहीच्या विरोधासाठी बोलत राहिलो, लढलो." अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.