Sanjay Raut News: भाजपनं देशाच्या सुरक्षेचा खेळखंडोबा केला; राऊत कडाडले

Jammu Kashmir News:. कलम रद्द के 370ल्याचे सांगत सत्ताधारी उड्या मारत आहेत...
Sanjay Raut On PM Narendra Modi
Sanjay Raut On PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या ट्रकवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत.

या घटनेवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 'आपल्या लष्करी केंद्रावर हल्ले होत आहेत, पण आपल्या लष्कराला त्यांची माहिती नसते. पुंछमध्ये झालेला हल्ला हा मिनी पुलवामा हल्याप्रमाणे आहे. सुरक्षेबाबतचा प्रश्न विचारला तर आम्हाला संसदेतून बाहेर काढले जाते,' अशी खंत राऊतांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराचे उद्धघाटन 22 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना अद्याप आमंत्रण आलेले नाही.

यावर राऊत म्हणाले, 'राममंदिरासाठी ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेचे मोठे योगदान आहे. पण उद्धव ठाकरेंना निमंत्रण आलेले नाही. राममंदिर ही कुणाची खासगी संपत्ती नाही, 22 जानेवारीचा सोहळा झाल्यानंतर आम्ही रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे. राममंदिरचा उपयोग आम्ही निवडणुकीसाठी करणार नाही,' असे टोला राऊतांनी लगावला.

Sanjay Raut On PM Narendra Modi
Baramati News: सुप्रिया सुळेंना घेरण्यासाठी भाजपचं ओबीसी कार्ड; पडळकरांवर मोठी जबाबदारी

राम मंदिरांसाठी शिवसेनेचे मोठे योगदान आहे, पण आम्हाला निमंत्रण नाही. श्रेय घेण्यासाठी भाजपकडून असे प्रकार सुरू असतात, असी टीका राऊतांनी केली आहे. देशाच्या सुरक्षेचा भाजपने खेळखंडोबा केला आहे. 370 कलम रद्द केल्याचे सांगत सत्ताधारी उड्या मारत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये शंभरपेक्षा अधिक जवान मारले गेले आहेत. अशा परिस्थितीही सरकार कुठला उत्सव साजरा करीत आहेत, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut On PM Narendra Modi
Social Media: वाचाळ आमदारांची चलती, सामाजिक सलोख्यालाही नख लावण्याचे प्रकार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com