संजय राऊतांनी फडणवीसांच्या जखमेवर चोळले मीठ : म्हणाले...

संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) आज थेट देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या दुखत्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केले.
Sanjay Raut News, Devendra Fadnavis News
Sanjay Raut News, Devendra Fadnavis Newssarkarnama

मुंबई - राज्यात शिवसेनेत दोन गट करून भाजपने सत्तेत एन्ट्री मिळविली असली तरी ज्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने शिवसेनेबरोबरील महायुती तोडली ते मुख्यमंत्रीपद मात्र देवेंद्र फडणवीस यांना मिळाले नाही. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून खासदार संजय राऊत पक्षात फुट पडल्याचे खापर फोडण्यात येत आहे. मात्र संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) आज थेट देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या दुखत्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केले. Shiv Sena vs BJP news update

संजय राऊत म्हणाले, मला देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत बोलताना उपमुख्यमंत्री हा उल्लेख करणे जड जात आहे. त्यांना एक तर माजी मुख्यमंत्री अथवा भावी मुख्यमंत्री असे आपण सतत बोलत राहिलो. मात्र त्यांच्या नावाच्या मागे उपमुख्यमंत्री हा शब्द लावायला मला फार जड जात आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत काय झाले हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

ते पुढे म्हणाले की, तुम्ही काही केले नसेल तर चौकशी यंत्रणांना तुम्ही सामोरे जायला हवे. त्याच आत्मविश्वासाने मी गेलो. आणि दहा-अकरा तासानंतर बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. त्यासाठी प्रयत्नही झाले. मात्र आम्ही गेलो नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेनेवर विश्वास ठेवणारे आहोत. जर सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचे कारण नाही. या राज्याची जनता, हजारो लाखो कडवट शिवसैनिक हे दूधखुळे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात नवीन सरकार आले आहे. नवीन विटी नवीन दांडू. त्यांनी त्यांचे महाराष्ट्र व मुंबई संदर्भातील काम करावे. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईवरील शिवसेनेची ताकद त्यांना नष्ट करायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपला खांद्यावर बंदूक ठेऊ दिली आहे. मुंबईवर बाळासाहेब ठाकरेंचाच शिवसेनेचा झेंडा राहील. शिंदेंना मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्रीपदा दिले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com