Sanjay Raut on NDA : 'मोदी अन् शाह हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा पक्ष फोडून...' ; संजय राऊतांचं मोठं विधान!

Sanjay Raut Vs PM Modi : नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत... असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut on BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. यावेळी मुद्दा लोकसभा अध्यक्ष पदाचा आहे. शिवाय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे आहेत, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊत(Sanjay Raut) मीडियाशी बोलताना म्हणाले, 'लोकसभेचे अध्यक्ष पद 'एनडीए'च्या घटक पक्षाने मागितलेला आहे. चंद्रबाबू नायडू यांचं मी नाव ऐकत आहे. ते जर त्यांना लोकसभेचे अध्यक्ष पद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाहीतर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे तेलगू देशम चंद्रबाबू नायडूचा पक्ष आणि नितेश कुमारचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही.

लोकसभेचा अध्यक्ष पद हे अत्यंत महत्त्वाचं असतं, महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते. त्या पदावर ते असल्यामुळेच शिवसेना घटनाबाह्य पद्धतीने फुटल्याचं जाहीर करण्यात आलं.'

Sanjay Raut
Congress : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर, पश्चिम बंगाल, ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष बदलणार?

याशिवाय 'चंद्राबाबू नायडू(Chandrababu Naidu) यांनी जर अध्यक्ष पदासाठी त्यांचा उमेदवार उभा केला, तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ. या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारला आहे, नाकारलं आहे.

भारतीय जनता पक्षाचा पराभव केला, यांच्या झुंड शाहीचा हुकूमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केला, त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पारदर्शक पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे आणि उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने घटनेने विरोधी पक्षाला मिळाला हवं.' असंही संजय राऊतांनी म्हटलं.

याचबरोबर 'आता नरेंद्र मोदींचा(Narendra Modi) काय तामजाम राहिलाय मला सांगा, टेकू वर बसले टेकू कधी घुसळू शकतो. राहुल गांधी आणि सांगितलं आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो. दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेते पदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे.' असा दावा संजय राऊतांनी केला.

Sanjay Raut
Suresh Gopi on Indira Gandhi : मोदी सरकारमधील मंत्री सुरेश गोपी म्हणतात, इंदिरा गांधी तर 'Mother of INDIA'

तसेच 'जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेते पदाचा प्रश्न आला असता, तर वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षाची बैठक बोलून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आलं, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो.' असंही राऊतांनी खळबळजनक विधान केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com