BJP's Kerala MP Suresh Gopi : लोकसभा निवडणुकीत भलेही भाजपला 240 जागा मिळाल्या असतील, परंतु केरळमध्ये पक्षाची कामगिरी चांगली राहिली. केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून सुरेश गोपी यांनी करुणाकरण यांचे चिरंजीव काँग्रेस नेते के. मुरलीधरन यांचा पराभव केला. त्यानंतर मोदी सरकार 3.0 मध्ये त्यांना पर्यटन, पेट्रोलियम राज्यमंत्री बनवलं गेलं. दरम्यान याच सुरेश गोपी यांचं एक विधा सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे.
सुरेश गोपी यांनी 12 जून रोजी पुन्कुन्नम येथे करुणाकरण यांचे स्मारक 'मुरली मंदरिम'चा दौरा केला. या दरम्यान त्यांनी मीडियाशी बोलताना, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला. एवढच नाहीतर त्यांनी इंदिरा गांधींचं वर्णन 'मदर ऑफ इंडिया' असं केलं. तेच त्यांनी करुणाकरण आणि मार्क्सवादी दिग्गज नेते ई.के. नयनार यांना आपला राजकीय गुरुही म्हटलं.
काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री राहिलेल्या करुणाकरण यांच्या स्मारकावर पोहचून केंद्रीयमंत्री सुरेश गोपी यांनी मीडियाला आग्रह केला की, त्यांच्या या दौऱ्याचा राजकारणाशी संबंध लावू नये. ते येथे या ठिकाणी आपल्या गुरुंना नमस्कार करण्यासाठी आले होते.
याप्रसंगी सुरेश गोपी यांनी म्हटले की, नयनार आणि त्यांची पत्नी के.पी. शारदा यांच्याप्रमाणेच करुणाकरण आणि त्यांची पत्नी कल्याणीकुट्टी अम्मा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.
सुरेश गोपी हे केरळ भाजपचे पहिले खासदार आहेत. त्यांनी सीपीआयच्या सुनील कुमार यांचा 75 हजार मतांनी पराभव केला. याचसोबत करुणाकरण यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते मुरलीधरण यांचाही पराभव केला. मुरलीधरण हे तिसऱ्या स्थानावर होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.