Sanjay Raut PC 55 मिनिटे, मुख्यमंत्र्यांशी पावणे दोन तास चर्चा : दोन दिवसांत मोठा निर्णय

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेने आता नवीन राजकीय नाट्य
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार (Sanjay Raut) यांच्या भाजपविरोधातील पत्रकार परिषदेनंतर पुढे काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तब्बल 55 मिनिटे बॅटिंग करत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि नील सोमय्या यांच्यावर आरोप केले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन पावणे दोन तास चर्चा केली. त्यामुळे राऊत यांच्या या साऱ्या खटाटोपानंतर राज्य सरकार काय पावले उचलणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

Sanjay Raut
वैतागलेल्या संजय राऊत यांनी त्या रात्री अमित शहांना फोन केला होता...

या पत्रकार परिषदेनंतर राऊत यांनी `वर्षा` निवासस्थानावर जावून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. भाजपच्या दडपशाहीला कसे उत्तर द्यायचे याबद्दल दोघांत चर्चा झाल्याचे समजते. `वर्षा`वरून बाहेर पडल्यानंतर या चर्चेत काय झाले, याचे फलित दोन दिवसांत दिसेल, असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

Sanjay Raut
Video:'मुलुंडचा दलाल सांगतो ईडीच्या धाडी पडणार'- संजय राऊत

काही शिवसेना नेते अनुपस्थित

आज शिवसेनानेते संजय राऊत यांच्या पत्रपरिषदेला सर्व महत्वाच्या सेनानेत्यांनी हजेरी लावली होती. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमुळे सांसदीय कामकाज मंत्री अनिल परब, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ,विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे हे या परिषदेला हजर राहू शकले नाहीत असे सांगण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हजर नव्हते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते ,आनंद अडसूळ हजर होते.सेनाभवनातून सर्व महत्वाच्या नेत्यांना ,मंत्र्यांना ,खासदार तसेच आमदारांना हजर रहाण्यासाठी निरोप दिले गेले होते. भाजपविरोधातील शक्तीप्रदर्शन म्हणून या पत्रपरिषदेकडे पाहिले गेले.

Sanjay Raut
Video : मोदींच्या जवळचे लोक बॅंका लुटत आहेत : नवाब मलिक

राऊत यांनी काही महत्वाच्या विषयांचा पत्रपरिषदेत उल्लेख करीत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणली आहेत. फडणवीस सरकारच्या काळात महाआयटीत गोंधळ झाला ,निविदा न मागवता कामे दिली गेली याची कल्पना होतीच.आज संजय राऊत यांनी पुढे आपण काही कागदपत्रे उघड करू असे सांगितले आहे. ती पाहू. ईडी त्यावर काही कारवाई करत नसेल तर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही कागदपत्रे सोपवण्याचा तिन्ही पक्ष एकत्र येवून विचार करू. केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबद्दल आता गैर भाजप राज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येत आहेत. तेथेही याबद्दल विचार करता येईल, असेही नवाब मलिक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com