Sanjay Raut On Seat Allocation : 'जिंकेल त्याची जागा', संजय राऊतांनी सांगितले जागावाटपाचे सूत्र !

Sanjay Raut On Seat Allocation : शिवसेनेच्या 23 जागांवर कुणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, मित्रपक्षांना सूचक इशारा?
Sanjay Raut On Seat Allocation
Sanjay Raut On Seat Allocation Sarkarnama

Mumbai News : सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांची 'इंडिया' आघाडीच्या (India Alliance) जागावाटपांवरुन घमासान घडून येत आहे. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात सुंदोपसुंदी सुरू असल्याचे चिन्ह आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत, काही लोक अफवा पसरण्याचं काम करत असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडीत समन्वय असल्याचे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. (Latest Marathi News)

Sanjay Raut On Seat Allocation
जानेवारीनंतर मोठी घडामोड होणार, मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार? | CM Shinde | Raj Thackeray

संजय राऊत म्हणाले, 'महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत ज्या काही वावड्या उठत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका. आघाडीत जागावाटपाबाबत समन्वय आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. राज्यातल्या 48 जागांवर मेरिटनुसारच आघाडी निवडणुकांना सामोरे जाणार आहे. जिंकेल त्यांची जागा हे सूत्र सुरुवातीपासूनच आहे. शिवसेनेची (ठाकरे गट) भूमिका कायम राहिली की 23 जागा लढवणारच, याच्यावर कुणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Seat Allocation
NCP Politics: अजित पवारांनी दिला भुजबळांच्या भात्यात आणखी एक बाण !

राऊत पुढे म्हणाले, 'वंचित बहुजन आघाडीच्या आमची चर्चा सुरू आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड 'मातोश्री'वर आले होते. आमच्यात दोन-अडीच तास जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली. यावर एकत्रितपणे चर्चा होत राहिल. काही लोक अफवा पसरवत आहेत, ते चुकीच्या आहेत.'

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com