Sanjay Raut: संजय राऊत हाजीर हो..! ईडी कार्यालयात हजर राहणार

Sanjay Raut| Maharashtra Politics|अशातच पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना हे समन्स बजावलं होतं.
Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना ईडीने समन्स बजावले होते, त्यानंतर आज दुपारनंतर ते ईडी कार्यालयात हजर राहू शकतात. "शुक्रवारी दुपारनंतर कदाचित मी ईडीसमोर हजर होईल आणि माझी भूमिका स्पष्ट करेल. मला पक्षाच्या, महाराष्ट्राच्या कामापासून रोखण्यासाठी हे सर्व दबावतंत्र सुरु आहे. या दबावांना बळी पडून आमचे काही लोक पळून गेले असले, तरी मी शुक्रवारी ईडीसमोर हजर राहीन, कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी त्याला सामोरं जायला तयार आहे." , असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. (Sanjay Raut Latest Marathi News)

त्यानंतर आज संजय राऊत यांनी ट्विट करत यांची माहिती दिली आहे. "आज दुपारी 12 वाजता मी ईडी कार्यालयात हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असं आवाहन करतो."

Sanjay Raut News, Maharashtra Political News, Shivsena News
पवार म्हणाले; माजी मुख्यमंत्र्यांनी मंत्री म्हणून काम करण्याचे फडणवीस पहिले उदाहरण नाही

राज्यातील गेल्या दहा दिवसांपासून वातवरण चांगलेच तापले आहे. अशातच पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना हे समन्स बजावलं होतं. ईडीने 28 जून रोजी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण त्यावेळी त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदत वाढवून मागितली होती. ईडीने ही चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्यांना 14 दिवसांची मुदतवाढ दिली.(Shivsena News)

काय आहे प्रकरण?

पत्राचाळ य़ेथील जागा म्हाडाने विकसनासाठी दिली होती. त्याबदल्यात वाधवान बिल्डर्सला एफएसआय देण्यात आला होता. पण वाधवान बिल्डर्सने एफएसआय इतरांना विकला. त्याबदल्यात पैसे घेतले. तसेच विकसनाच्या नावाखाली बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले. त्यातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.

याप्रकरणी म्हाडासह इतर बिल्डरांचेही नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी सुरू झाली. प्रविण राऊत यांना त्यानंतर अटक करण्यात आली. राऊतांच्या माध्यमातून संजय राऊतांच्या पत्नीला पन्नास लाख रुपये दिल्याचे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात आता संजय राऊतांचाही संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com