Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवारांचे त्या वक्तव्यावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण; त्यांच्या बोलण्यातून...

Maharashtra Politics| शरद पवार यांच्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Sanjay Raut On Sharad Pawar:
Sanjay Raut On Sharad Pawar: Sarkarnama

Sanjay Raut replied on Sharad Pawar's Statement : आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार की नाही हे अताच सांगता येणार नाही,एकत्र लढण्याची इच्छा पुरेशी नसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या विधानावरुन सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानाने वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत. पण त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

"शरद पवारांच्या (Sharad Pawar) बोलण्याचा नेहमीच वेगळा अर्थ काढला जातो. पण त्यांना जे काही बोलायचंय ते समजून घ्या. महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. आम्ही एकत्र आहोत हे सांगण्याासाठी आम्ही लवकरच म्हणजे येत्या १ मे ला मुंबईत महाविकासा आघाडीची सभा घेणार आहोत. महाविकास आघाडीची ही (Mahavikas Aghadi) ऐतिहासिक सभा सभा असेल. या सभेला तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. (Maharashtra Politics)

Sanjay Raut On Sharad Pawar:
Sharad Pawar on 2024 Election: मविआ 2024च्या निवडणुका एकत्र लढणार का? शरद पवारांच्या उत्तराने खळबळ

"महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र राहवं हीच त्यांची इच्छा आहे. तिनही पक्ष एकत्र राहिले, तर २०२४ साली आपण भाजपाचा नक्की पराभव करू आणि लोकसभा निवडणुकाही मोठ्या संख्येने जिंकू, अशी शरद पवार यांची भूमिका असल्याचंही राऊतांनी सांगितलं. (Maharashtra Politics)

तसेच, महाविकास आघाडीसंदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल, मला अजिबात असं वाटत नाही. थोड्याच वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरून महाविकास आघाडीत तुटावी असं मला कधी वाटलं नाही. असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

Sanjay Raut On Sharad Pawar:
Arni APMC Election : सहकारी संस्थेच्या जागा हडपणारेही उतरले बाजार समितीच्या निवडणुकीत !

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार (Sharad Pawar Latest news) रविवारी (२३ एप्रिल) अमरावती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शरद पवारांनी 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात मोठं विधान केलं आहे.  2024 च्या निवडणुका मविआ (Mahavikas Aghadi) एकत्र लढेल का? तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत येईल का? असे सवाल त्यांना विचारण्यात आले. यावर '' अद्याप वंचित आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. वंचितसोबत फक्त कर्नाटकातमधील मर्यादित जागांविषयी चर्चा झाली आहे. बाकी दुसरी कसलीही चर्चा झाली नसल्याचे उत्तर शरद पवार यांनी दिले.

तसेच, 2024 च्या निवडणुका मविआ एकत्र लढेल का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी फक्त एकत्र लढण्याची इच्छा पुरेशी नसते. असं म्हटलं आहे.पण त्यांच्या या उत्तरमुळे मात्र आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com