Sanjay Raut News: संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा; २० जूनपर्यंत सुनावणी लांबणीवर...

Patra Chawl Scam News: मुंबई सत्र न्यायालयात मंगळवारी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर आरोप निश्चित होणार होते.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama

Mumbai News: मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत आरोपी आहेत. तसेच या प्रकरणी ऑगस्ट महिन्यात अटक केल्यानंतर संजय राऊत तब्बल 104 दिवस कारागृहात होते. ते सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई सत्र न्यायालयात मंगळवारी(दि.१०)पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत(Sanjay Raut)यांच्यावर आरोप निश्चित होणार होते. यासाठी राऊत न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, आता संजय राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा(Patrachawl) प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Sanjay Raut Latest News
Nitesh Rane News : ''संजय राऊत लँडमाफिया...''; उध्दव ठाकरेंवरही दंगली भडकावण्याचा राणेंचा गंभीर आरोप

संजय राऊत आणि प्रवीण राऊत मुंबई सत्र न्यायालयात पोहोचले होते. मात्र आरोपी सारंग आणि राकेश वाधवान आजही न्यायालयात गैरहजर होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी सर्व आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्याचे तपासयंत्रणेला आदेश दिले आहेत.

यावेळी संजय राऊतांनी आपला राजस्व पासपोर्ट नूतनीकरणासाठी परत करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज सादर केला आहे. ईडी(ED)चा राऊतांच्या अर्जाला विरोध नाही. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालय राऊतांच्या अर्जावर उद्या (११ मे) निर्णय देणार आहे.

Sanjay Raut Latest News
Karnataka Election 2023 : 'मोदी मैजिक चल रहा है..' ; BJP पूर्ण बहुमताने सत्तेत येणार : येदियुरप्पा

काय आहे आरोप ?

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतू, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे 'फ्रंटमॅन' म्हणून वावरत होते. प्रवीण राऊत यांच्यामार्फत संजय राऊत व्यवहार करत होते. घोटाळ्यातील पैशांचा वापर संजय राऊत यांनी विविध मालमत्ता खरेदी केला असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com