BJP Vs Shivsena : ...अन्यथा 105 आमदार असूनही विरोधातच बसावं लागलं असतं; शिंदे गटाच्या नेत्याने फडणवीसांना सुनावलं

Eknath Shinde and Devendra Fadnavis : लोकसभा जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांत धुसफूस कायम
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीत वारंवार ठिणगी पडत असल्याचे दिसून येत आहे. जागावाटपात भाजप शिवसेना शिंदे गटाला महत्त्व देत नसल्याची टीका होत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करीत केसाने गळा कापू नये, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, असा दम कदमांनी भाजपला दिला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कदमांना गांभीर्याने घेण्याची काही गरज नसल्याचे विधान करून आम्हीच एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री केले, याकडे लक्ष वेधले. यावर शिंदे गटाकडूनही फडणवीसांना आरसा दाखवण्याचे काम करण्यात आले. (BJP Vs Shivsena)

रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते, रामदासभाईंना मी चांगले ओळखतो. त्यांना असे विधान करण्याची सवय आहे. कधी कधी ते टोकाचेही बोलतात. मात्र, त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भाजपने शिवसेनेचा सन्मानच केलेला आहे. आम्ही 105 आहोत तरीदेखील एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून आमचे समर्थन आहे. महायुतीतील सर्व पक्षांना सन्मान देऊनच निवडणुकांना सामोरे चाललो आहोत. पुढेही त्यांचा सन्मान ठेवणारच आहोत. मात्र, अनेक लोक वारंवार आमचे लक्ष वेधून घेण्यासाठी टोकाची भूमिका घेतात. आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्यांना गंभीरतेने घेऊ नये.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी प्रशासन अलर्ट, तब्बल 70 हजार कर्मचारी 'ऑन ड्युटी'; असे आहे प्लॅनिंग

फडणवीसांच्या या विधानाचा शिरसाटांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, भाजपचे यापूर्वीही 105 आमदार होते. त्यावेळी ते विरोधात बसत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केला आणि भाजप सत्तेत बसले. शिंदेंनी धाडस केले नसते तर भाजपच्या 105 जणांनाही विरोधातच बसावे लागले असते. त्यामुळे शिंदे यांच्यामुळे भाजप सत्तेत आहेत आणि भाजपमुळेच शिंदे सत्तेत आहेत. दोन्ही बाजू तितक्याच खऱ्या आहेत. त्यामुळे आता कोणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, महायुतीतील भाजप-शिवसेनेत लोकसभेच्या जागावाटपांवर एकमत होत नसल्याचे दिसत नाही. जोपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नाही, तोपर्यंत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभेसाठी महायुतीत भाजपला सर्वाधिक म्हणजे 30 हून अधिक जागा मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांतून महायुतीत जागावाटपाचे दोन फॉर्म्युला तयार असल्याची माहिती समोर येत आहे. यात भाजपला 34 किंवा 37, शिवसेनेच्या शिंदे गटाला 8 किंवा 10 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 3 किंवा 4 जागा दिल्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. या फॉर्म्युल्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Thane Political News : 'मुंब्रादेवी' पाणी टंचाईविरोधात पेटली 'मशाल'; ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com