Pune District
Pune DistrictSarkarnama

Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी प्रशासन अलर्ट, तब्बल 70 हजार कर्मचारी 'ऑन ड्युटी'; असे आहे प्लॅनिंग

Pune District Lok Sabha Constituency : पुणे शहर, बारामती, शिरूर, तसेच मावळ या चार लोकसभा मतदारसंघांत आठ हजार 213 मतदान केंद्र
Published on

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढील काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांसाठी आपल्यालाच संधी मिळावी, यासाठी अनेक इच्छुकांनी आपल्या पद्धतीने पक्षाच्या वरिष्ठांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनानेदेखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. (Latest Political News)

पुणे जिल्ह्यात येत असलेल्या पुणे शहर, बारामती (Baramati), शिरूर, तसेच मावळ या चार लोकसभा मतदारसंघांतील आठ हजार 213 मतदान केंद्रांसाठी तब्बल 70 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागातील आणि कर्मचारी यांची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune District
Lok Sabha Election 2024 : केवळ ‘चारसौ पार’ नव्हे भाजपचे खरे मिशन ‘स्पेशल 25’

पुणे जिल्ह्यात (Pune) समावेश असलेल्या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. 14 तालुक्यांमध्ये सुमारे आठ हजार 213 इतकी मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्रांवर विविध कामांसाठी कर्मचारी आणि अधिकारी यांची गरज भासते. त्या दृष्टीने शहरातील विविध विभागातील कर्मचारी अधिकारी यांची यादी तयार केली जात आहे. त्यांना पुढील काही दिवसांत ऑर्डर दिल्या जाण्याची शक्यता आहे, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका जिल्हा परिषद यासह इतर सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी हजर होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

Pune District
Madha Loksabha Constituency : माढ्याचा तिढा सुटणार...भाजपचा बडा नेता उतरणार लोकसभेच्या रिंगणात?

मतदान केंद्रामध्ये मतदान होण्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत आवश्यक असलेल्या कामांसाठी या कर्मचारी वर्गाची गरज लागणार आहे. आयत्या वेळेस धावाधाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त पोलिस आणि अधिकारी यांची यादीदेखील तयार करण्याचे काम आता प्रशासनाने युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election 2024) विविध कामांसाठी सध्या राज्य सरकारच्या विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. तसेच महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, विनाअनुदानित तसेच खासगी अनुदानित शाळांचे कर्मचारी, शिक्षक, राष्ट्रीय बँकांचे कर्मचारी अशा विविध विभागातील चार हजार 689 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश केला आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Pune District
Uddhav Thackeray Speech : 'मोदींच्या गॅरंटीत फक्त 'टी'... ; चहावरून ठाकरेंनी पंतप्रधानांना डिवचले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com