

ED Action Against Sanjeev Jaiswal : राज्य सरकारने कोरोना काळातील घोटाळे बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड काळात तब्बल साडेबारा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते सर्व पैसे वसूल करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. आता त्यादृष्टीने पावले उचलण्यात आलेली आहेत. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदास संजय राऊत यांच्या निटकवर्तीयांवर कारवाईचा बडगा उचलल्यात आला आहे. दरम्यान, तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांवरही कारवाई करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
मुंबईतील करोना सेंटरसाठी वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी लाईफ लाईन कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार मुंबई पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व म्हाडाचे विद्यमान उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर ईडी कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे सनदी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सत्तासंघर्षात अधिकाऱ्यांचा बळी जात असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.
या कारवाईत जयस्वाल दाम्पत्याच्या नावावर मोठी रक्कम असल्याचे आढळून आले आहे. यावेळी आढळलेली मालमत्ता त्यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जयस्वाल यांच्या पत्नीकडे मढ आयलँडला अर्धा एकर भूखंड आणि एकूण ३४ कोटी रुपयांचे सदनिका आहेत. त्यांच्या नावावर २४ मालमत्ता आहेत. तर १५ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. एका आयएएस अधिकाऱ्याकडे एवढी मोठी संपत्ती कुठून आली, याचा तपासही ईडीकडून करण्यात येणार आहे. यामुळे संजीव जयस्वाल यांच्या आडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या प्रकरणाची कॅगमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र साथरोग नियंत्रण कायद्यान्वये हा खर्च केल्याचे सांगून लेखापरीक्षण करता येणार नाही अशी भूमिका आयुक्त इकबाल चहल यांनी चौकशी करण्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतर या घोटाळ्य़ाची तक्रार ईडीकडे करण्यात आली. त्याची दखल घेत ईडीने महापालिका आयुक्त चहल यांची चौकशी केली होती.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.