Nana Patole News: सत्तेत आल्यास सरकारच्या पैशातून कारखान्याची चिमणी बांधून देणार; 'सिद्धेश्वर'च्या संचालकांना नाना पटोलेंचं आश्वासन

Nana Patole on Siddheshwar Factory: देशमुखांचं घर अनधिकृत जागेत; नाना पाटोलेंची माजी मंत्री सुभाषबापू देशमुखांवर अप्रत्यक्ष टीका
Nana Patole News
Nana Patole NewsSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांची कारखान्यावर जाऊन भेट घेतली. काही दिवसांपूर्वी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोजनरेशनची चिमणी सोलापूर महानगरपालिकेकडून पाडण्यात आली होती. आता कारखान्याच्या या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास यावेळी नाना पटोले यांनी धर्मराज काडादी यांना दिला.

नाना पटोले यांनी संवाद साधत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपलं सरकार आल्यानंतर सरकारच्या पैशातून कारखान्याची चिमणी बांधून देण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं. तसेच नाना पाटोले यांनी यावेळी माजी सहकारमंत्री सुभाषबापू देशमुख यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच देशमुख यांचे घरही अनधिकृत जागेत असल्याचा दावा यावेळी नाना पटोले यांनी केला.

Nana Patole News
Opposition Unity Meeting : भाजपच्या पोपटाचे विधान प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचे नाही : नाना पटोलेंचा पलटवार

सोलापूरच्या दोन्ही विद्यमान आमदार आणि माजी मंत्री देशमुखांचं एकमेकांबरोबर पटत नाही. त्यातील एका देशमुखांचं तर घर अतिक्रमणातच आहे, असं म्हणत नाना पाटोले यांनी माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांवर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सरकारच्या पैशातून ही चिमणी बांधून देऊ, असा विश्वासही त्यांनी कारखान्यातील कामगारांना दिला.

Nana Patole News
Aditya Thackeray News : कोविड सेंटर घोटाळ्यातील 'तो' निर्णय आदित्य ठाकरेंचा; सोमय्यांचा गंभीर आरोप

दरम्यान, सोलापूरचे सध्याचे खासदार हे लिंगायत धर्माचे गुरुजी आहेत. पण गुरुजी आहेत, म्हणून लोकांनी वोट मारली आणि सुशीलकुमार शिंदे सारख्या चांगल्या माणसाला पाडलं, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, असं म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com