Dhananjay Munde Resignation: मोठी बातमी: महायुतीची पहिली 'विकेट' पडली! धनंजय मुंडे यांचा राजीनामा

Dhananjay Munde resignation News: मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे पीए प्रशांत जोशी हे राजीनामा घेऊन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले होते. फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करीत होते. मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

त्यांचे पीए प्रशांत जोशी हे राजीनामा घेऊन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर गेले होते. फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला असल्याचे फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे काल फोटो व्हायरल झाले असून राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले होते, त्यानंतर मुंडे यांच्या पीए जोशी यांनी फडणवीस यांच्याकडे मुंडे यांच्याकडे राजीनामा दिला. रविवारी रात्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी समाज माध्यमांवर मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरले.

Dhananjay Munde
Santosh Deshmukh Murder Case: भावाच्या क्रुर हत्येचा पहिला फोटो पाहिल्यानंतर धनंजय देशमुखांनी टाहो फोडला! जरांगेंच्या गळ्यात पडून रडले

मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतरआरोपींना फाशींची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा मुंडे यांनी फेसबूक पोस्ट केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवासापूर्वी मुंडे यांचा राजीनामा घेतल्याची आपल्याला माहिती आहे, असे ठोसपणे करुणा मुंडे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं होते. ३ मार्च रोजी राजी नामा होगा, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली होती. खुनात मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा, अशी मागणी विरोधकांनी विधिमंडळात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.