Santosh Deshmukh Murder Case : ''महाराष्ट्राला यातून एक उदाहरण मिळणार'' ; मुख्यमंत्र्यांची भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं सूचक विधान!

CM Fadnavis and Santosh Deshmukh Family Meeting : जाणून घ्या, मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? ; आमदार सुरेश धस यांचीही होती उपस्थिती
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Update : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाल्याने, अवघा महाराष्ट्र हादरला आहे. शिवाय या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही कमालीचं तापलेलं आहे. विरोधकांनी तर या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तर महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातील आरोपींना आणि त्यांच्या 'आका'ना पकडून शिक्षा व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान आज मृत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या(Devendra Fadnavis) भेटीसाठी मुंबईत पोहचले होते. याप्रसंगी आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची साधारण दीड तास चर्चा झाली. यानंतर संतोष देशमुख यांच्या बंधुंनी या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही काय मुद्दे मांडले आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितल, याबाबत मीडियला माहिती दिली.

संतोष देशमुख(Santosh Deshmukh) यांचे बंधू या भेटीबाबत मीडियाला माहिती देताना म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जे पहिल्या दिवशी अधिवेशनात जे सांगितलं होतं, तेच आश्वासन आम्हाला दिलं आहे. याप्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडलं जाणार नाही. जे कोणी दोषी असतील त्या सर्वांना शिक्षा होणार आहे. महाराष्ट्राला यातून एक उदाहरण भेटणार आहे. की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही, असं आश्वासन आम्हाला दिलं गेलं आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Manoj Jarange And Anjali Damania : बीड प्रकरण उचलून धरणाऱ्या दमानिया अन् जरांगेंच्या अडचणी मुंडे समर्थकांनी वाढवल्या; आता 'या' शहरात गुन्हा दाखल

आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे, निवेदन दिलेलं नाही आणि आमच्याकडे जे काही अधिकृत होतं ते आम्ही त्यांना दाखवलं आहे. आम्हाला न्याय हवा आहे आणि तो कसा मिळेल, हे आम्ही त्यांना सांगितलं आहे. आम्ही केवळ न्यायाची भूमिका मांडली. निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला होकार दर्शवला आहे.

या प्रकरणातील जे एफआयआर आहेत, त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर ही घटना घडली त्या कालावधीतील सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे तपास करावा, अशी मागणी केली. आम्ही 28 मे पासूनचे एफआयआर मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

Santosh Deshmukh Murder Case
MLA Hemant Patil News : अशोकाचे झाड उंच, पण ना सावली, ना फळ! नांदेडला मंत्रीपद न मिळाल्यावरून आमदार हेमंत पाटलांचा टोला..

याप्रकरणात जे कोणी दोषी असतील, ज्यांनी हत्या केली असेल त्या सर्वांना शिक्षा होणार आहे. मागील चार-पाच महिन्यातील एफआयआर एकमेकांशी कसे काय जुळतात? याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ज्या प्रकारे चौकशी सुरू आहे, त्याचा अहवाल मिळण्याबाबतही आम्ही चर्चा केली. जो काय तपास झालेला आहे तो एक-दोन दिवसांत आम्हाला समजेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com