Congress Election Strategy: सतेज पाटील अन् प्रणिती शिंदेंनी सांगितला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्याचा 'हा' फॉर्म्युला

Pune Congress Meeting: काँग्रेस नेते सतीश पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
Satej Patil Praniti Shinde .jpg
Satej Patil Praniti Shinde .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.27) पुण्यामध्ये काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली. यावेळी अनेक नेत्यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी काँग्रेस नेते सतीश पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, सह प्रभारी बी. एम. संदिप, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेतील गटनेते व निरीक्षक सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदींसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका अध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी, विविध आघाड्या व सेलचे प्रमुख उपस्थित होते.

सतेज पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, राहुल गांधी यांनी मतचोरीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खिडकी उघडली आहे, आता आपल्याला निवडणुकीचे जोरदार तयारी करून दार उघडायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता फक्त तीन महिन्यांचा कालावधी असणार आहे. या तीन महिन्यांत निवडणुका संपणार आहेत.

त्यामुळे दरम्यानच्या काळात सर्वांनी सोशल मीडियावर सक्रिय होणे गरजेचे आहे. तसेच काही दिवसांमध्ये होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी कंबर कसावी लागणार आहेत. त्या दृष्टीने आपण पदवीधर नोंदणी करणे गरजेचे असून त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

Satej Patil Praniti Shinde .jpg
Medha Kulkarni Garba Issue: नागरिकांचे फोन मेसेज आले अन मेधा कुलकर्णी प्रचंड संतापल्या, मग थेट जाऊन गरबाच बंद पाडला

'राहुल गांधींनी महाराष्ट्राचा दौरा करावा...'

प्रणिती शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला, नागरिकांना राज्य सरकारने अद्याप मदत केलेली नाही. असा परिस्थितीमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचा दौरा करून बाधित शेतकऱ्यांशी व नुकसान ग्रस्त नागरिकांशी संवाद साधावा,यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रयत्न करून पाठवा पुरावा करावा.

तसेच लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकसंघ काम केल्याने यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत सगळ्यांच्या अति आत्मविश्वास व तिकीट वाटपातील गोंधळ यामुळे नुकसान झाले. हा गोंधळ जाणून बुजून निर्माण केला गेला.

Satej Patil Praniti Shinde .jpg
BJP News: विधानसभेनंतर भाजपनं निवडणुकीचा पॅटर्न बदलला! कार्यकर्त्यांना दिलं नवं 'टार्गेट',चव्हाणांची फडणवीसांच्या 'होमग्राऊंड'मधूनच मोठी घोषणा

मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतभेद टाळून व मतविभाजन टाळून चांगले यश संपादित करू. यावेळीही मतचोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यासाठी मतदार याद्या तपासणे गरजेचे आहे, असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com