मनसेचे पुण्यात आज शक्तीप्रदर्शन ; ठाकरी तोफ धडाडणार

वर्धापनदिन सोहळ्यातून पक्ष महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
raj thackeray
raj thackeray sarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा आज पुण्यात ( MNS Anniversary In Pune) आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिरात वर्धापनदिनाची तयारी पूर्ण झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्तास तरी स्वबळावरच निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्यामुळे वर्धापनदिन मेळाव्यात त्या दृष्टीने काही घोषणा केली जाणार का, याकडे सर्व मनसैनिकांचे लक्ष असेल.

मनसेचा वर्धापनदिन दर वर्षी मुंबईत होतो. राज्यभरातील मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वर्धापनदिनाला हजेरी लावतात. पुण्यातील शहर आणि जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी वर्धापनदिनासाठी मुंबईत हजेरी लावतात; पण यंदा प्रथमच वर्धापनदिन कार्यक्रम घेण्याची सर्व जबाबदारी मनसेच्या पुणे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. त्या दृष्टीने पुणे शहर मनसेनेने तयारी केली आहे.

raj thackeray
नरके म्हणाले, ''ओबीसी थँक्सलेस केस ; आरक्षण रद्द करण्यासाठी कोण एवढा खर्च करतेय?

वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना पांढरा फेटा आणि भगवी साडी देखील देण्यात येणार आहे. वर्धापनदिनानिमित्त मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

मनसेचा प्रभाव असलेल्या मुंबईप्रमाणेच पुणे, ठाणे, नाशिक अशा भागांत गेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला होता. गेल्या महापालिका निवडणुकांपेक्षा या वेळचे चित्र एकदम वेगळे आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, भारतीय जनता पक्ष विरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवली गेल्यास मनसेने भाजपसोबत युती करावी, अशी मागणी केली जात आहे

मेळाव्यात राज्यातील मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, या वर्धापनदिन सोहळ्यातून पक्ष महापालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com