Satyajeet Tambe : आमदारकीची शपथ घेताच सत्यजित तांबे पोचले थेट आझाद मैदानावर

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी आज (ता. ८ फेब्रुवारी) मुंबईत विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज (ता. ८ फेब्रुवारी) मुंबईत विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेट घेतली. त्यानंतर थेट आझाद मैदान (Azad Maidan) गाठले. तेथे विविध विषयांवर सुरू असलेल्या आंदोलकांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यामुळे तांबे यांनी शथप घेताच लागलीच कामाला लागले आहेत. (Satyajeet Tambe reached Azad Maidan directly after taking the oath of MLA)

पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांनी आज मुंबईतील विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर ते तातडीने कामाला लागले. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांची भेट घेतली. विनाअनुदानित शिक्षकांना शाळा तपासणीची अट न ठेवता तातडीने अनुदान द्यावे आणि वेतनात महागाई निर्देशांकानुसार वाढ व्हावी, यासाठी निवेदन पत्र दिले. तसेच, जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चेसाठी भेटण्यास वेळ देण्याची विनंती केली.

Satyajeet Tambe
Congress News : काँग्रेसमधील वाद वाढला : थोरातांची पाठराखण करत सुनील केदारांचा पटोलेंना इशारा

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अनुदानित विनाशिक्षकांना वेतन देण्याचा आणि शिक्षण सेविकांचे मानधन वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला. हे दोन चांगले निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. पण, विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबत सरकारी निर्णय घेताना त्यामध्ये शाळांना पुन्हा तपासणीची अट घातली आहे. मुळातच या अगोदरही अनेक वेळा शाळा, वर्ग आणि तुकड्यांची तपासणी झालेली आहे. त्यामुळे ही अट काढून सर्वांना अनुदान सुरू करावे. तसेच शिक्षण सेविकांचे मानधनाची वाढ ही महागाई निर्देशांकानुसार करावी. जुन्या पेन्शन योजनेबाबत आपल्याशी चर्चा करण्यासाठी वेळ द्याव, अशी मागणीही तांबे यांनी केली आहे.

Satyajeet Tambe
Rajan Patil News : ‘नक्षत्र’मधून वाचण्यासाठीच राजन पाटलांचा भाजप प्रवेश : विजयराज डोंगरेंनी डागली तोफ

शपथविधीनंतर थेट आझाद मैदान गाठले. तिथे विविध विषयांवर सुरू असलेल्या आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हे सर्व प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांपर्यंत मांडण्याचे आश्वासन संबंधित आंदोलनकर्त्यांना दिले, असेही आमदार तांबे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com