मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान उफाळून आलेला काँग्रेसमधील (Congress) वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावरील कारवाई आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानाला काँग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कुणीही काँग्रेस पक्ष घरचा समजू नये, हे सर्वांनाच लागू आहे. ती व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी त्या व्यक्तीला हा नियम लागू आहे’ असे म्हणत थोरात यांची पाठराखण करत केदार यांनी पटोले यांना इशारा दिल्याचे मानले जात आहे. (Controversy increased in Congress: Sunil Kedar's warning to Patoles while backing Thorats)
काँग्रेस पक्षाला कुणीही घरचा पक्ष समजू नये. तसं जर कोणी समजत असेल तर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई केली जाईल, असे विधान नाना पटोले यांनी केले होते. त्याला काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कारवाईबाबतचा नियम सर्वांना लागू आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही पदावर असो,’ असे सांगून केदार यांनी बाळासाहेब थोरात यांची पाठराखण करत नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे, त्यामुळे काँग्रेसमधील वाद चांगलाच उफाळून आला आहे.
केदार म्हणाले की, कुणी हा पक्ष घरचा समजू नये, हे सर्वांनाच लागू आहे. म्हणजे हे एका व्यक्तीला नाही. ती व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी त्या व्यक्तीला हा नियम लागू आहे. कोणाला हा पक्ष सरसकट घरचा वाटत असेल तर मग ते सगळ्यांनाच लागू होईल. सगळ्यांनाच लागू होईल म्हणजे सगळ्यांनाच. एवढ्यात तुम्ही समजून घ्या, असे म्हणत एक प्रकारे पटोले यांना इशारा दिल्याचे मानले जात आहे.
तुम्हाला, हे नाना पटोले यांना म्हणायाचे आहे का, असे विचारले असता पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्याला हा नियम लागू आहे. कुणालाही हा पक्ष घरचा आहे, हे समजता येणार नाही. बरं झालं त्यांनीच (नाना पटोले) याबाबत खुलासा केला ते, असेही सुनील केदार या वेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.