Serum Institute : अदर पूनावाला यांना हायकोर्टाचा झटका ; लसीच्या दुष्पपरिणाम प्रकरणी लवकरच सुनावणी!

Adar Poonawala : लसीच्या दुष्परिणामांमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा अशी याचिका.
Adar Poonawala Serum Institute
Adar Poonawala Serum Institute Sarkarnama
Published on
Updated on

Serum Institute : पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट;चे प्रमुख अदर पूनावाला (Adar Poonawala) यांना उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. कोरोना प्रतिबंध लसीच्या दुष्परिणामांमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची, याचिका एका नागरिकाने केली होती. याच याचिकेमध्ये 100 कोटी रूपयांचा दावाही करण्यात आला होता.

Adar Poonawala Serum Institute
Babanrao Pachpute : ॲम्ब्यूलन्स फसली, पण तेव्हा त्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते नव्हते...

अदर पूनावाला यांना कोणताही तातडीने दिलासा देण्यात उच्च न्यायालयाने नकार दिला. कोरोना लसी संदर्भातलं हे प्रकरण आहे. कोरोनाची लस घेतल्याने आपल्या डॉक्टर असलेल्या मुलीवर विपरित परिणाम झाले. लसीचे दुष्पपरिणाम भोगावे लागले, यातच तिचा मृत्यू झाला, असा दावा करत दिलीप लुणावत नावाच्या एका व्यक्तिने आपल्या मुलीसाठी नुकसान भरपाई आणि यासाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. सीरम इन्स्टिट्युट आणि पुनावाला यांच्यावर १०० कोटी रूपयांचा दावा ही ठोकला आहे.

याच संदर्भाने पूनावाला यांच्याकडून यावर दाद मागण्यात आली होती. लुणावत यांच्याआरोपात कोणताही तथ्य नसल्याचा दावा, पूनावाला यांच्या वतीनेही न्यायालयाला करण्यात आले होते. लुणावत यांच्या याचिकेला स्थिगिती द्यावी, अशी मागणी पूनावाला यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली आहे. कोणताही दिलासा पूनावाला यांना देण्यास नकार दिला आहे. आता या याचिकेवर लवकर सुनावणी होईल.

Adar Poonawala Serum Institute
मोठी बातमी : आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

याच बरोबर या प्रकरणात मुख्य म्हणजे सीरम इन्स्टिट्युट, अदर पुनावाला यांच्यासह सीरमचे भागीदार असलेले बिल गेट्स यांच्यावरही आरोप करण्यात आलेले आहेत. गुगल, यू ट्यूब या सोशल मिडीया साईटवर ही लसीचे दुष्परिणाम लपवण्यात आले, या कटात त्यांचाही सहभाग असल्याचा ठपका याचिकेमध्ये ठेवण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com