बंडखोर आमदार शंभूराज देसाईंनी गुवाहटीमध्ये बसून मारले साताऱ्यातील निवडणुकीचे मैदान

Shambhuraj Desai | Shivsena | Satara : शंभूराजे देसाई यांचा मोठा विजय
Sambhuraj Desai
Sambhuraj Desai Sarkarnama

सातारा : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटात सामिल झालेले पाटणचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आसाममधील गुवाहटीमध्ये बसून साताऱ्यातील निवडणुकीचे मैदान मारले आहे. देसाई यांच्या नेतृत्वात मरळी (ता. पाटण, जि.सातारा) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम दिवशी फक्त शंभूराज देसाई यांच्या कै.शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलचे अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोधच झाली. (Shivsena | Sambhuraj Desai Latest News)

या विजयाचे शिंदे यांच्या गटाकडून या विजयाचे सेलिब्रेशनही गुवाहाटीमध्ये करण्यात आले. एकनाथ शिंदेंसह अन्य आमदारांनी शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्याचे फोटो देखील पाटणमधील समर्थकांनी व्हायरल केले आहेत. दरम्यान या निवडणुकीच्या माध्यमातून आपला मुलगा यशराज देसाई याचेही लाँचिंग केले आहे. शंभूराज यांनी आसाममध्ये बसूनच या निवडणुकीची सारी सूत्र हलवली होती.

दरम्यान शिंदे यांच्या गटातून देसाई सोमवारी विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच रात्री सुरतला रवाना झाले. तिथून ते गुवाहटीला गेले होते. मात्र इकडे मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. परंतु देसाईंनी कारखान्याच्या निवडणुकीची अगोदरच रणनिती आखली होती. उमेदवार निश्चित केले होते. स्वत:चा उमेदवारी अर्ज घेऊन भरून ठेवला होता. सूचक, अनुमोदकामार्फत तो भरला होता. कारखाना निवडणुकीच्या प्रक्रियेवर त्यांचे तेथून लक्ष होते.

इकडे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार सत्यजीत पाटणकर (Satyajeet Patankar) यांच्या गटाने पाटण तालुक्यात साखर कारखाना सुरु केल्याने यंदा देसाई कारखान्याची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. त्यामुळे विरोधी पाटणकर गट विरोधात पॅनेल टाकणार नसल्याचा अंदाज आला होता. निवडणूक बिनविरोध होणार हे ओळखून त्यांनी आपला मुलगा यशराज देसाई याचेही राजकीय लाँचिंग केले. अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे सध्या स्वतःचा विजय, तरूण चेहर्‍याची सहकारात एन्ट्री, आणि बिनविरोध निवडणूक, असा तिहेरी जल्लोष शंभूराज देसाईंच्या गोटात साजरा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com