शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस (Sharad Pawar 81 Birthday) आहे. त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 Amol kolhe
Amol kolhesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''महाराष्ट्राच्या नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली, त्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत,'' असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.

''आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही,'' असे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.

 Amol kolhe
ठाकरे सरकारला टक्केवारीतच रस ; बहुजन पोरांविषयी देणंघेणं नाही

ते म्हणाले, ''बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांचे नेते शरद पवार यांना भेटायला येतात. हर अर्जुन का सारथी हेच ते. तुम्हाला आम्हाला लढावे लागेल. त्यांचासमतेचा विचार मनात घ्यावा लागेल. भुज भूकंपवेळी शरद पवार यांनी केलेल्या कामाची वाहवा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस (Sharad Pawar 81 Birthday) आहे. त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजकीय वर्तुळातील अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) बोलत होते.

 Amol kolhe
गोपीनाथ मुंडे असते तर, युती कायम राहिली असती!

कोल्हे म्हणाले, ''महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे शरद पवार हे फुलेंचे वैचारिक वारसदार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. पवार हे गेली चाळीस वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे खासदास संजय राऊत म्हणाले, ''शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राला दूरदृष्टी लाभलेल नेतृत्व आहे. ते

देशाचे संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री असताना आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं होते,''

''शरद पवार हे जनतेशी थेट संवाद असलेले हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील अस काम करणारे नेते आहेत. राज्यात आज जो महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे तो त्यांच्या नेतृत्वामुळे सफल झाला आहे,'' असे राऊत म्हणाले.

पवारांना मी खुर्ची का दिली

शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकची बोलणे’ हा ग्रंथ राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांनी लिहिला आहे. त्याचे प्रकाशन खासदार संजय राऊत, ज्येष्ठ साहित्यीक रंगनाथ पठारे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते शनिवारी (ता. ११ डिसेंबर) मुंबईत झाले. यावेळी राऊत म्हणाले, "मी दिल्लीत शरद पवारांना बसायला खुर्ची दिली, त्याबद्दल माझ्याबाबत बरंच काही बोललं गेलं. अनेकांनी टिकाटिपण्णी केली. जे विकृतपणे माझ्यावर टीका करत होते, त्यांना हे पुस्तक वाचल्यावर कळेल की पवारांना मी खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे. पण, आपल्या देशात सध्या विकृत राजकारण सुरू आहे, त्याच्यावरसुद्धा पवारांनी २५ ते ३० वर्षांपूर्वी कोरडे ओढले आहेत, हे आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून दिसून येते,''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com