Supriya Sule News : साहेब-दादांच्या भेटीत मी नव्हते ; राजकीय विचार वेगळे मात्र, कुटुंब एकच..

Maharashtra Politics : त्यांच्यात भेटीत काय घडले माहीत नाही..
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमधील पुण्यातील मीटिंगवरून राजकीय महाविकास आघाडीत वादळ उठले आहे. राष्ट्रवादीतील भेटीगाठीच्या सत्रावरून याच पक्षातील नेते, कार्यकर्ते बुचकळ्यात पडले असतानाच, खासदार सुप्रिया सुळेंनी पवारसाहेब आणि अजितदादांच्या भेटीवर बोलून सावध पवित्रा घेतला.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Sushma Andhare slams Devendra Fadnavis : सोमय्यांचा गेम भाजपनेच केला ; अंधारेंचा दावा ; फडणवीस शब्द पाळत नाहीत...

'पवारसाहेब आणि अजितदादांच्या भेटीत मी नव्हते. त्यांच्यात काय घडले माहीत नसल्याचे सांगून सुळेंनी या भेटींच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी राजकीय विचार वेगळे; मात्र, कुटुंब एकच असल्याकडेही सुळेंनी लक्ष वेधले.

तीन दिवसापूर्वी पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याची चर्चा आहे. या भेटविषयी आज सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले. त्या माध्यमांशी बोलत होत्या. “नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण या दोन्ही गोष्टींमध्ये कुणीही गल्लत करु नये” असे सुळे यांनी सांगितले.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Hitendra Thakur News : 'कार्यालयात येऊन फटकावेन’ आमदाराची मुजोरी ; महापालिका अधिकाऱ्यांना दमदाटी; तुमच्या कानाखाली वाजवली पाहिजे..

शरद पवार आणि अजित पवार यांची चोरडिया यांच्या बंगल्यावर भेट झाली त्यावेळी तेथे जयंत पाटील सुद्धा उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्योजक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यातून शरद पवार हे निघून गेले. तर अजित पवार मात्र, बंगल्यातच उपस्थित होते, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीत कसलाही संभ्रम नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. भाजपशी संबंधित असलेल्यांशी आमचा काहीही संबंध असणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com