Sushma Andhare slams Devendra Fadnavis : सोमय्यांचा गेम भाजपनेच केला ; अंधारेंचा दावा ; फडणवीस शब्द पाळत नाहीत...

Maharashtra Politics : खासदार नवनीत राणा यांच्यावरही सुषमा अंधारेंनी टीका केली.
Devendra Fadanvis | Sushma Andhare
Devendra Fadanvis | Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : काही दिवसापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ सोमय्यांचा असल्याचे म्हटलं होते.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी यावरून फडणवीसांकडे बोट दाखवत व्हिडिओ सोमय्यांचाच आहे, हे सांगायची घाई फडणवीसांना झाली होती. सोमय्यांचा गेम भाजप नेत्यांनीच केला, असा दावा अंधारेंनी केला आहे.

सुषमा अंधारे या सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. "देवेंद्र फडणवीस शब्द पाळत नाहीत. आता एकनाथ शिंदे केव्हा मुख्यमंत्रीपदावरून जातील याचा नेम नाही, अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. भाजप नेते केवळ उपयोग करून घेतात, उपयोग झाला की त्यांना फेकून दिले जाते. भाजपने सोमय्यांचा उपयोग करून त्यांना फेकून दिले आहे, असा आरोप अंधारेंनी भाजपवर केला आहे.

Devendra Fadanvis | Sushma Andhare
Rahul Gandhi News : राहुल गांधी खरंच 'गांधी' आहेत का ? शरद पोक्षेंच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले...

यापूर्वीही अंधारे यांनी सोमय्या यांचा व्हिडिओ भाजपने व्हायरल केल्याचा खळबळजनक आरोप आहे. “चर्चा करावी असा हा व्हिडिओ नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल ते काय बोललं ? त्यांनी का केलं याचा परिणाम होत असतो. आता अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्याचं वस्त्रहरण केलं आहे. ईडी, सीबीआय चौकशी लावण्याच्या धमकी देत सोमय्यांनी 40 महिलांची फसवणूक केली आहे, ” असा आरोप अंधारेंनी केला होता.

Devendra Fadanvis | Sushma Andhare
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या समर्थनार्थ अमरावतीत लावलेले बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले.. ; ...मोहब्बत की जीत

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावरही सुषमा अंधारेंनी टीका केली. "हनुमान चालीसा 'मातोश्री'वर म्हणण्याची काय आवश्यकता आहे. त्यांना हनुमान चालीसा येत नाही व पाठही नाही, धर्म नावाची गोष्ट भाजपसाठी राजकारणाचं साधन आहे," अशी टीकाही अंधारेंनी केली.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com