क्रिकेटच्या मैदानात शरद पवार आणि शेलार एकाच टीममध्ये...

Cricket : पवारांच्या गटामध्ये मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे.
Sharad Pawar & shish Selar
Sharad Pawar & shish SelarSarkarnama

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) आगामी निवडणुकीत (MCA Election) एक वेगळाच योगायोग बघायला मिळत आहे. आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

मात्र, यानिवडणुकीमध्ये चक्क शरद पवार (Sharad Pawar) गट आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गटाची युती झाली असून या गटाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज पवार आणि शेलार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Sharad Pawar & shish Selar)

Sharad Pawar & shish Selar
Andheri by Poll : शिवसेनेसाठी काँग्रेस मैदानात; 50 ते 60 हजार मतांनी विजयाचा निर्धार!

पवार आणि शेलारांचा गट एकत्र आल्याने आता या निवडणुकीत पवार गटातील अध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील यांच्यासह इतर उमेदवारांचं भवितव्य काय असेल, याबाबत प्रश्न निर्माण झालायं. या निवडणुकीत पवारांच्या गटामध्ये मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांचा समावेश आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले अमेल काळे हे देखील मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक लढवत आहेत.

Sharad Pawar & shish Selar
मुनगंटीवार म्हणतात, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठल्याचा आनंद नाही, तर दुख झालं...

दरम्यान, या निवडणुकीसाठी पवारांनी आपला वेगळा गट जाहीर करत त्यांच्या उमेदवारांनी अर्ज देखील भरले होते. मात्र, आज पूर्ण निवडणुकीला अचानक कलाटणी मिळाली आहे. पवार आणि शेलारांमध्ये नेहरू सेंटर येथे झालेल्या बैठकीनंतर दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबरच त्यांनी या संयुक्त गटाचं निवेदनही जाहीर केलं आहे. यामुळे आता उर्वरित उमेदवारांचं काय होणार आणि काय निकाल लागणार याची उत्सुकता मात्र लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com