Andheri by Poll : शिवसेनेसाठी काँग्रेस मैदानात; 50 ते 60 हजार मतांनी विजयाचा निर्धार!

Shivsena : काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे...
Nana Patole, Uddhav Thackeray, Shivsena , Congress
Nana Patole, Uddhav Thackeray, Shivsena , CongressSarkarnama

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. त्यानंतर बंडखोर गटाने भाजपच्या साथीने राज्यात नवं सरकारही स्थापन केलं आहे. यानंतर त्यांच्याकडून आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, हा वाद निवडणूक आयोगात अद्याप प्रलंबित आहे. मात्र अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीमुळे तात्पुर्त्या स्वरूपात शिवसेना पक्षाच नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आयोगाने गोठवलं आहे. यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये ही लढत होण्याची जास्त शक्यता आहे. यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्ष म्हणून कॅाग्रेसने (Congress) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या निवडणुकीत साथ देण्याचं ठरवलं आहे. (Nana Patole, Uddhav Thackeray, Shivsena , Congress Latest News)

Nana Patole, Uddhav Thackeray, Shivsena , Congress
छगन भुजबळांच्या वाढदिवसाचा 'अमृत महोत्सव' सोहळा 'या' दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये ज्या निवडणूका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहिलं त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं आमचं ठरल होत. त्याप्रमाणे आम्ही या अंधेरी पुर्व पोट निवडणुकीला शिवसेनेला पाठिंबा देतोय, असे पटोले म्हणाले. याबरोबरच सोनिया गांधी यांच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली असून यावरूनचं आम्ही हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहेत, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

Nana Patole, Uddhav Thackeray, Shivsena , Congress
नवा वाद पेटणार? ठाकरेंच्या चिन्हांवरही शिंदे गटाचा दावा

ते पुढे म्हणाले, सोनिया गांधी यांनी भाजपला गप्प करण्यासाठी हे पाऊल उचल आहे. ही जागा काँग्रेसची आहे. पण सेनेला सहकार्य करू, असा निर्णय आम्ही घेतला आहे. काँग्रेस पूर्ण ताकतीने प्रचार करणार आणि सेनेला मदत करून निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला 50 ते 60 हजर मतांनी विजयी करू, असा निर्धार पटोलेंनी व्यक्त केला. तसेच, आज जे काही प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत. एक अत्याचारी सरकार केंद्र सरकारच्या रूपात आलेलं आहे. केंद्रात अलेलं भाजपच्या सरकारचा दबाव केंद्रिय निवडणूक आयोगावर आहे, असल्याचा टीकाही त्यांनी केली.

Nana Patole, Uddhav Thackeray, Shivsena , Congress
धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेचे निवडणूक आयोगालाच आव्हान...

दरम्यान, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, अमित विलासराव देशमुख, प्रवक्ते राजू वाघमारे, शिवसेना सचिव विनायक राऊत, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, ऍड. अनिल परब हे देखील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com