Sharad Pawar NCP : शरद पवारांचे 'हे' 40 शिलेदार राज्यभर उडवणार धुरळा

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत तुतारी फुंकण्यासाठी ज्येष्ठ, वरिष्ठ, युवा नेते, कार्यकर्ते सज्ज
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मूळ पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेला आहे. हातातून पक्ष गेल्यानंतर आठ महिन्यांतच आपला पक्ष उभा केला. निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटले आहेत. लोकसभेसाठी त्यांनी मंगळवारी (ता. २ एप्रिल) आपल्या पक्षातील ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून यादी जाहीर केली आहे. Sharad Pawar list of Star Campaigner for Lok Sabha Election 2024

शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केलेली आहे. आता निवडणुकीसाठी पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. पक्षप्रमुख शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदी नेते राज्यभर तुतारी फुंकणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Nashik Shivsena : नाशिकबाबत महायुतीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री शिंदेंचा गोडसेंना सबुरीचा सल्ला, समर्थक आक्रमक

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रचारकांच्या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule), पी. सी. चाको, जयंत पाटील, फौजिया खान, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), वंदना चव्हाण, सोनिया दुहान, राजेश टोपे, रोहित पवार, जयदेव गायकवाड, अशोक पवार, शशिकांत शिंदे, अरुण लाड, प्राजक्ता तनपुरे, सुनील भुसारा, नसीम सिद्दीकी, रोहित आर. पाटील, रोहिणी खडसे, मेहबूब शेख, सक्षणा सलगर, पूजा मोरे आदी नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीतून तिकीट दिले आहे. वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून नीलेश लंके (Nilesh Lanke) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sharad Pawar
Lok Sabha Election 2024 : 'भाजपचे खासदार उन्मेश पाटील दणका देणार?' महाजन म्हणतात, 'याची फक्त चर्चाच...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com