MVA Protest In Mumbai Over Chhatrapati Shivaji Statue Collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने आज, महायुती सरकारच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरचदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'हुतात्मा स्मारका'स वंदन करून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी 'गेट वे ऑफ इंडिया' येथे पोहचले. तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन सरकारच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आलं.
यावेळी शरद पवारसाहेब ( Sharad Pawar ) शिंदे सरकावर तुटून पडल्याचं पाहायला मिळाले. शरद पवार म्हणाले, "गेट वे ऑफ इंडिया येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. सागरी किनाऱ्यावरील हा पुतळा गेली 50 वर्षे सर्वांना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शिवरायांचे अनेक पुतळे आहेत. पण, मालवणध्ये उभा करण्यात आलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना होता."
"मालवमधील पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा समज जनतेत आहे. हा शिवरायांचा आणि शिवप्रेमींचा अपमान आहे. हा अपमान करण्याची भूमिका घेणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा होता," असा हल्लाबोल शरद पवारसाहेबांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.