Mumbai : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानं कुठल्या गटात जावे, यावर अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी, नेते संभ्रमात आहेत. अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. दोन जुलैला राष्ट्रवादीतील झालेल्या घडामोडीनंतर विदर्भातही पक्षात फुट पडत आहेत.
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह सामुहिक राजीनामा दिला आहे. सुबोध मोहिते हे अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. मोहिते यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मोहितेंचा राजीनामा हा शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. ते रामटेकमधून खासदार होते. आपण विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याचे मोहिते यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटलं आहे.
मोहितेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असलं तरी जिल्ह्यातील मुळ राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
कोण आहेत सुबोध मोहिते..
शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान शेतकरी संघ, शिवसंग्राममध्ये मोहिते यांनी वास्तव्य केले आहे.
1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात ते तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर यांचे स्वीय सचिव होते.
1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्याच वर्षी मोहिते यांनी रामटेक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली.
त्यांच्या विजयात राष्ट्रवादीचे उमेदवार पांडुरंग हजारे यांना मिळालेली मते महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव झाला होता.
सुबोध मोहिते यांनी मे 2021 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
वाजपेयी सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री असलेले मोहिते यांनी नंतर शिवसेनेविरुद्ध बंड केले.
नारायण राणेंसोबत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर राजकीय पक्षामध्येही ते बाजूलाच राहिले आहेत.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.