Rupali Chakankar ON Sadabhau Khot : पवारांना 'सैतान' म्हणणाऱ्या सदाभाऊंवर चाकणकर संतापल्या ; आपला आवाका बघून बोला..,"

Maharashtra Politics : शरद पवार यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे, अशी जहरी टीका ​​​​​​सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
Rupali Chakankar ON  Sadabhau Khot news update
Rupali Chakankar ON Sadabhau Khot news updateSarkarnama
Published on
Updated on

Pune : माजी मंत्री, रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. या टीकेला अजित पवार यांच्या गटात गेलेल्या रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिले. शरद पवार यांची साथ सोडली असली तरी खोतांनी पवारांवर केलेल्या टीकेचा समाचार चाकणकरांनी घेतला.

दोन जुलैला राष्ट्रवादी फुटल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांच्या गोटात जाणे पसंत केले आहे. रूपाली चाकणकर यांनी अजित पवार यांना समर्थन दिले असून चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Rupali Chakankar ON  Sadabhau Khot news update
Ganpat Gaikwad Fake Facebook Account : भाजप आमदार महिलांना पाठवायचा मेसेज ? ; फेक अकाऊंट उघडकीस, एकाला अटक

सदाभाऊ खोत यांनी केलेल्या शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले आहेत. "पुतण्यापासून मला वाचवा अशी नवीन हाक आता महाराष्ट्रला ऐकू येत आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू येत होती” अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी रविवारी शरद पवारांना डिवचलं आहे. त्यावर रुपाली चाकणकरांनी टि्वट करीत सदाभाऊंना खडेबोल सुनावले आहेत.

"आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल बोलताना अतिशय संतापजनक विधाने करणाऱ्या विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत यांचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. सदाभाऊ खोत यांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांच्या बौद्धिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. आपला आवाका आणि कुवत बघून त्यांनी बोलावं," असा सल्ला चाकणकरांनी खोतांना दिला आहे.

"राष्ट्रवादी काय आहे हे आपण सांगण्याची गरज नाही, ज्या माणसाला पक्ष स्थापन करून ४ कार्यकर्ते जमवता आले नाहीत त्यांनी देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या आदरणीय पवार साहेबांवर बोलायची गरज नाही," असे चाकणकरांनी त्यांना सुनावले आहे.

शरद पवार सैतान आहेत. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे.पवारांवर नियतीने,काळाने मोठा सूड उगवला आहे. जैसी करनी, वैसी भरनी. शरद पवार यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे, अशी जहरी टीका ​​​​​​सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Rupali Chakankar ON  Sadabhau Khot news update
Uddhav Thackeray : अजितदादांच्या बंडाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया ; "महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही.."

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत..

  • 80 च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला.

  • शरद पवार सैतान आहेत. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. पवारांवर नियतीने,काळाने मोठा सूड उगवला आहे. जैसी करनी, वैसी भरनी. शरद पवार यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे.

  • हा सैतान पुन्हा गावगाड्यात येऊ नये आणि पुन्हा नवे सरदार बनवू नये. यासाठी लढाई लढावी लागेल. शरद पवार यांच्या कालखंडात सरंजामशाही, 50 वर्ष महाराष्ट्रात अंमल होता, देवेंद्र फडणवीस यांनी गवताचा भारा विस्कटला, आता गवताच्या कांडया तुटून पडतील.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com