Sharad Pawar : राष्ट्रवादी 'मविआ'च्या 'CM'पदाच्या शर्यतीतच नाही म्हणणाऱ्या शरद पवारांचे सूर बदलले; आता म्हणाले...

Sharad Pawar On Mahavikas Aaghadi CM Candidates : एकीकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा जो कोणीही उमेदवार असोत जाहीर करा, आपण त्याच्या पाठीशी राहू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण नेहमीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती.
Sharad pawar NCP
Sharad pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडण्याआधीच महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा, असा आग्रह धरला होता. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता.

तसेच निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत तीनही पक्षांचे प्रमुख नेते यावर एकत्रित बसून निर्णय घेतील असं शरद पवारांनी सांगितलं होतं. पण आता मविआत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या मु्द्द्यानं डोकं वर काढलं आहे. खुद्द महाविकास आघाडीचे जनक शरद पवार (Sharad Pawar) यांनीच आता आघाडीच्या CM पदाबाबत मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आघाडीच्या मुख्यमंत्रिपदासह अनेक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की,महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसून निर्णय घेणार आहोत.

Sharad pawar NCP
Aditya Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुरतहून उद्धव ठाकरेंना फोन..; आदित्य यांच्या फोडणींने ठसका उठणार

याचवेळी ज्यांच्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडायला सांगू आणि त्याला आम्ही पाठिंबा देऊ,अशी स्पष्ट भूमिका आपल्या पक्षाची असल्याचं पवारांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.

एकीकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा जो कोणीही उमेदवार असो त जाहीर करा, आपण त्याच्या पाठीशी राहू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण नेहमीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती.

Sharad pawar NCP
Lawrence Bishnoi Gang : मोठी बातमी : बाबा सिद्दीकी यांच्यानंतर पुण्यातील बडा नेता होता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली होती.अर्थात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करावा असाही आग्रह धरला होता. सुरुवातीला ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. तर राष्ट्रवादीने तर सुरुवातीला आम्ही मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नसल्याचेही विधान केलं होतं. पण आता शरद पवारांचे सूर बदलले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसून आलं. पण महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही फॉर्म्युला जाहीर केला नाही किंवा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही समोर केलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com