Sharad Pawar News : एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये CM करण्यास हरकत नव्हती, पण..; त्यावेळी नेमकं काय झालं पवारांनी सांगितलं

Eknath Shinde : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बैठकीत पक्षनेता निवडीवर कुणी काहीही बोलले नाही. त्यावेळी शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरेंचे नाव पुढे केले. त्यास कुणीही हरकत घेतली नाही.
Sharad Pawar News : एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये CM करण्यास हरकत नव्हती, पण..; त्यावेळी नेमकं काय झालं पवारांनी सांगितलं

Maharashtra Political News : राज्यात 2019 पासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींमुळे राज्याचे राजकीय संपूर्ण स्थिती बदलून गेली आहे. दरम्यान, 2019 मध्ये महाविकास आघडीचे सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री निवडीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचे नाव सूचवले आणि ते मुख्यमंत्री झाले. मात्र त्यावेळी आमची एकनाथ शिंदेंच्या नावाला काहीच हरकत नव्हती, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केले आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी Sharad Pawar 2019 मध्ये मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या नावाला हरकत नव्हती, असे सांगितले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीएपोचा प्रयोग करताना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे नाव घेतले जात होते. त्याला मात्र काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडल्याची चर्चा होती. पवारांनी मात्र शिंदेंच्या नावाला काही हरकत असल्याचे कारण नसल्याचे सांगितले.

पवार म्हणाले, 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आमच्यात बैठक झाली त्यावेळी पक्षनेता निवडीवर कुणी काहीही बोलले नाही. त्यावेळी शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरेंचे Uddhav Thackeray नाव पुढे केले. त्यास कुणीही हरकत घेतली नाही. त्यानंतर आम्हाला शिंदेंबाबत समजले. शिंदेवरून पक्षांतर्गत वेगळीच चर्चा होती. तोपर्यंत आमचा आणि त्यांचा फारसा संबंध नव्हता. त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमचा विरोध नव्हता. आताही शिंदे आमच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून आहेत, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

Sharad Pawar News : एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये CM करण्यास हरकत नव्हती, पण..; त्यावेळी नेमकं काय झालं पवारांनी सांगितलं
Jalna Lok Sabha Analysis : 'मिशन 45'मध्ये जालना आहे का? रावसाहेब दानवेंच्या 'या' दाव्यानंतर आकडेमोड सुरू

दरम्यान, 2019 मध्ये युतीत मुख्यमंत्रि‍पदावरून वाद झाल्याने शिवसेना बाहेर पडली आणि राष्ट्रवादी, काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेनेतून एकनाथ शिंदे Eknath Shinde बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. त्यास वर्ष उलटत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री बनले. हे सर्व कारस्थान भाजपने केल्याचा आरोप होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar News : एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये CM करण्यास हरकत नव्हती, पण..; त्यावेळी नेमकं काय झालं पवारांनी सांगितलं
Tawde Meet Raj Thackeray : मुंबईत मतदानाला अवघे काही तास उरले असताना तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com