
Pahalgam terror attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण संतापाची लाट उसळली आहे. राजकीय नेत्यांकडून तोडीस तोड, असं उत्तर देण्याची भाषा वापरली जात आहे. यात शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
"हा देशावर हल्ला झाला आहे. देशाला आव्हान दिलं आहे. घडलं ते वाईटच आहे. अतिरेक्यांनी यापूर्वी देखील तीन ते चार हल्ले झाले, तेव्हा धर्माची चर्चा झाल्या नाहीत. पण आज धर्माची चर्चा सुरू आहे. ती का होतेय? पण यातून धार्मिक अंतर वाढले, असे काही घडू नये. पण या हल्ल्याचा परिणाम निवडणुकांवर होतील, असं मला वाटतं", अशी मोठी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार (Sharad Pawar) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. तिथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "काश्मीर मध्ये जे झाले, या प्रश्नात आम्ही सर्व देश एका विचाराने सरकार सोबत राहिले पाहिजे. इथं राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी जो हल्ला केला, तो भारताविरोधी होता. देशाविरुद्ध, असं कोणी निर्णय घेतं, तिथं राजकारण करायचे नसते. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले". सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये आमच्या पक्षातर्फे सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, असेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी सरकारचे देखील काच टोचले. सरकारने अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण गेले काही दिवस सरकारतर्फे सतत सांगितले जात होते की, आम्ही दहशतवाद (Terrorist) मोडून काढला, आम्ही दशतवाद संपवला, आता काय चिंता नाही, असं होत असेल तर आनंद आहे. पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष् झाले. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. सरकारने अधिक गांभीर्याने घ्यावे. आम्ही सरकारला सर्वोत्तपरी सहकार्य करू, अशीही भूमिका शरद पवार यांनी माडंली.
इंटेलिजन्स फेल्युअर आहे, हे सरळ दिसते आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी जाऊन आलो आहे. सातत्याने आपले लोक तिथे जातात दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, त्यामुळे तो अधिक सावधान करणार आहे. आपण काळजी घ्यायला हवी, असेही शरद पवार यांनी म्हटले.
हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या, असे सांगितले जात आहे. यावर शरद पवार यांनी यामध्ये काय सत्य आहे, याबाबत मला माहिती नाही. पण तिथं जी लोक होते, त्यातील स्त्रियांना सोडलं, असं दिसतं आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितले की, आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावल्याची माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे का? आज प्रश्न ज्यांनी हल्ले केले, त्यांना शोधायला हवे. मी आज कोणाला काढा कोणाला सोडा, याबद्दल बोलणार नाही. मात्र या हल्ल्यानंतर लोक काही दिवस काश्मीरला जाणार नाहीत, असेच दिसते. त्यामुळे काश्मीरच्या जनतेचे मोठं नुकसान होईल. पण एक जमेची बाजू घडली आहे, ज्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.
केंद्र सरकार पाकिस्तानविरोधात अॅक्शन मोडवर आहे. सिंधू काराराला स्थगिती दिली. याशिवाय विमान सेवा रोखली गेली. यावर बोलताना शरद पवार यांनी आज आपण असे निर्णय घेतो. उद्या पाकिस्तान सुद्धा अशा प्रकारचे निर्णय घेईल. त्यांचे विमान आमच्या हद्दीत येणार नाही, असं जर तुम्ही ठरवलं, तर आपली विमाने देखील त्यांच्या हद्दीत जाणार नाहीत, असं ते ठरवतील. युरोप देशांकडे जाणारी सर्व विमान पाकिस्तान मार्गे जातात.जर पाकिस्तान मार्गे विमान गेली नाही, तर विमान प्रवास अधिक महाग होईल. आपण काही निर्णय घेतले, तर पाकिस्तान गप्प बसेल, असे वाटत नाही, याकडे लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.