Sharad Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर कोण निर्णय घेणार? शरद पवारांनी थेट सांगून टाकलं

Sharad Pawar CM Devendra Fadnavis Minister Dhananjay Munde Beed Santosh Deshmukh murder case : मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर कोणी निर्णय घ्यायचा, यावर शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषद मोठं विधान केले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे, यावर शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.

यावर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला पाहिजे, असे सांगून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवार यांच्या कोर्टातून काढून थेट मुख्यमंत्र्यांकडे टोलवला. शरद पवार यांच्या या मतामुळे महायुतीमधील भाजप आणि अजित पवार यांची कोंडी झालीच, याशिवाय महायुतीत मंत्री मुंडेबाबत काय निर्णय होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

बीडमधील (BEED) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव वाढत आहे. यावर मुंबईच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना वैयक्तिक मत विचारलं. त्यावर शरद पवार यांनी मत मांडताच महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली.

Sharad Pawar
Bajrang Sonwane : मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला शांत झोप येतेच कशी? आमच्या सारख्यांना जमिनीनं उचलून फेकलं असतं; खासदार सोनवणे संतापले

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव संपूर्ण महाराष्ट्रातून तयार होत असताना त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून निर्णय होत नाही. यावर शरद पवार म्हणाले, "राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे. संबंध महाराष्ट्रात चर्चा काय आहे, त्याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. याच्याबद्दलची ती माहिती आहे, ती गृहखात्याकडे अधिक असते". त्यामुळे वस्तूस्थितीवरून राज्यकर्त्यांनी परिणामांची काळजी न करता तातडीने करायला पाहिजे, असा माझा आग्रह राहील, असेही शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar
Ajit Pawar Vs BJP : भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासण्याच्या तयारीत, युतीमध्येही वादाची ठिणगी?

शरद पवार म्हणाले, "परभणी आणि बीडमधील मस्साजोग गावात पहिल्यादा मीच गेलो होतो. सर्वसामान्यांमध्ये जी प्रतिक्रिया पाहिली, ती चिंताजनक होती. सामाजिक तणाव जाणवला. तसं स्वच्छ दिसत होते. ही बाब मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. राजकारण न आणता, एकवाक्यता अन् सुसूत्रता कशी आणता येईल, यावर काम करणे गरजेचे आहे".

मविआमधील संवाद संपलेला नाही

महविकास आघाडीमधील संवाद संपलेला नाही. पुढील आठ ते दहा दिवसांत महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होतील. खासदार सोडून भाजपमध्ये जाणार का? यावर शरद पवार यांनी एका पक्षप्रमुखाला तुम्ही असा प्रश्न करत आहात, असे म्हणून संतापले. काही तरी तारतम्य बाळगा, असा सल्ला देखील दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com